डॅडी v/s शकील; 'दगडी चाळ 2' सिनेमातील नव्या एन्ट्रीनं वेधलं लक्ष Dagdi chawl | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dagdi Chawl 2: Daddy V/S Shakil, New Entry- Ashok Samarth

डॅडी v/s शकील; 'दगडी चाळ 2' सिनेमातील नव्या एन्ट्रीनं वेधलं लक्ष

Dagdi chawl 2: मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर निर्मित, चंद्रकांत कणसे दिग्दर्शित 'दगडी चाळ २' (Dagdi chawl) ह्या चित्रपटात 'सूर्या' ,'डॅडी' ,'सोनल' यांच्या कहाणीतला नवीन इक्का म्हणजे 'शकील'. 'सूर्या' आणि 'डॅडी' या दोघांच्या वादात आता 'शकील' कहाणीला काय नवीन वळण आणतोय ते चित्रपट पाहिल्यावरच कळेल. म्हणतात ना वैऱ्याचा वैरी म्हणजे मित्र हीच डोकॅलिटी वापरून 'शकील'ने मारलेली कमाल एन्ट्री प्रेक्षकांची उत्सुकता अजून वाढवत आहे.(Dagdi Chawl 2: Daddy V/S Shakil, New Entry, Ashok Samarth)

हेही वाचा: 'आपला एखादा मित्र सोडून गेल्यावरती...'; जितेंद्र जोशीची भावूक पोस्ट चर्चेत

'डॅडी' ची ऑफर सूर्या स्वीकारतो की शकील सोबत हात मिळवतो हे गुपित अजून गुलदस्त्यातच आहे. शकील ने दिलेली ऑफर सूर्या स्वीकारेल का? ह्याचे उत्तर येत्या १९ अॅागस्टला चित्रपट पाहिल्यावरच कळणार. 'डॅडी' वर्सेस 'शकील' यांचे वैर चित्रपटाला वेगळाच तडका लावणार असा वाटत आहे.

हेही वाचा: सचिनचं पहिलं लग्न झालंय म्हणून सुप्रियाने नकार दिला होता? जाणून घ्या लव्हस्टोरी

ह्या चित्रपटात अंकुश चौधरी (सूर्या), पूजा सावंत (सोनल), मकरंद देशपांडे (डॅडींच्या )भूमिकेत असून (शकील) च्या भूमिकेत अशोक समर्थ आहेत. दहशतवाद,गॅंगवॉर,राजकारण ,ऍक्शन आणि लव्हस्टोरी पुन्हा एकदा 'दगडीचाळ २' मध्ये आपल्याला पाहायला मिळणार.

हेही वाचा: 'दीया और बाती' फेम कनिष्का सोनीनं स्वतःशीच केलं लग्न; म्हणाली,'मला पुरुष..'

निर्मात्या संगीता अहिर म्हणतात," यंदा दगडी चाळ २ चित्रपटात गॅंगवॅारसोबत राजकारणातील ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत आणि ते ट्विस्ट प्रेक्षकांना आवडतील ही आशा आहे. हा चित्रपट एकाच वेळी वर्ल्डवाइड प्रदर्शित होणार आहे.''

Web Title: Dagdi Chawl 2 Daddy Vs Shakil New Entry Ashok

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..