esakal | Sardar Udham Trailer : 'इंग्रजांना केली पळता भुई थोडी'
sakal

बोलून बातमी शोधा

Sardar Udham Trailer : 'इंग्रजांना केली पळता भुई थोडी'

Sardar Udham Trailer : 'इंग्रजांना केली पळता भुई थोडी'

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - ऐतिहासिक चित्रपटांना योग्य त्या कथानकाची आणि दिग्दर्शनाची जोड मिळाल्यास ते प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय व्हायला फारसा वेळ लागत नाही. गेल्या काही चरित्रपटांवरुन ते दिसून आले आहे. काही दिवसांपासून विकी कौशलच्या सरदार उधमच्या लूकची चर्चा होती. आज त्याचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. त्याला अवघ्या काही तासांत हजारो व्ह्युज मिळाले आहेत. भारतीय स्वातंत्र्यापूर्वीचा काळ हा त्या चित्रपटामध्ये रेखाटण्यात आला आहे. ट्रेलरवरुन त्या चित्रपटाचे निर्मितीमुल्य, संवाद, वेशभूषा, सेट यांची भव्यता नजरेत भरल्याशिवाय राहत नाही. रॉनी लाहिरी आणि शील कुमार यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन शुजित सरकार यांनी केले आहे.

बॉलीवूडचा आघाडीचा अभिनेता विकी कौशलनं सरदार उधम सिंग यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटामध्ये शॉन स्कॉट, स्टिफेन हॉगन, बानिता संधू आणि क्रिस्टी ऍव्हर्टन यांच्या महत्वापूर्ण भूमिका असून अमोल पराशर एका विशेष भूमिकेमध्ये असणार आहे. भारत तसेच 240 देश प्रदेशातले प्राईम सभासद जगभरामधून येत्या दस-याला 16 ऑक्टोबरला सरदार उधम प्रेक्षकांना पाहता येणार आहे. . ट्रेलरमध्ये सरदार उधम सिंगच्या जीवनाची झलक पहायला मिळते. विकी कौशल यात आधी कधीही न दिसलेल्या नव्या अवतारात दिसला आहे. या कधीही न सांगितल्या गेलेल्या गाथेमध्ये अज्ञात राहिलेल्या एका नायकाचे आपल्या इतिहासामध्ये खोलवर दडून राहिलेले अजरामर शौर्य, धैर्य आणि निर्भीडपणाची अनुभूती येते. 1919च्या जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये निघृणपणे मारल्या गेलेल्या प्रियजनांच्या मृत्यूचा सूड घेणा-या सरदार उधम सिंग यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे.

याविषयी अधिक माहिती देताना अभिनेता विकी कौशल म्हणाला, "सरदार उधम सिंहच्या कथेने मी मंत्रमुग्ध आणि प्रेरित झालो जी दृढता, वेदना महत्वाकांक्षा, अभूतपूर्व धाडस आणि बलिदानाचे प्रतिनिधीत्व करते. यापैकी ब-याच पैलूंना मी चित्रपटातली माझी भूमिका साकारताना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. उधम सिंग साकारताना मानसिक मोठ्या प्रमाणात करावी लागली.

हेही वाचा: बिग बॉसची विजेती हॉस्पिटलमध्ये पुसतेय फरशी

हेही वाचा: खबरदार, वन मोअर टेक म्हणाला तर... सुपरस्टारला होतं खडसावलं

loading image
go to top