लाखों दिलोंकी धडकन! फ्रिजमध्ये बसलेल्या या गोंडस अभिनेत्याला ओळखले का?

टीम ईसकाळ
Monday, 19 August 2019

या फोटोमुळे तो आता जितका हॉट आहे, तितकाच लहानपणी किती गोंडस होता याची कल्पना येतीय. तर मग ओळखलं का या गोंडस अभिनेत्याला??   

सध्या तरूणींच्या दिल की धडकन बनलेल्या बॉलीवूड अभिनेत्याने आज त्याच्या लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमुळे तो आता जितका हॉट आहे, तितकाच लहानपणी किती गोंडस होता याची कल्पना येतीय. तर मग ओळखलं का या गोंडस अभिनेत्याला??   

हा गोड मुलगा तोच आहे, ज्याने 'उरी : द सर्जिकल स्ट्राईक'मध्ये दर्जेदार अभिनय करून प्रेक्षकांची मनं जिंकली होती... हो हो, हा आहे विकी कौशल! सगळ्यांना माहितीच असेल की, विकी सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टीव्ह असतो. कधी हॉट फोटोमुळे तर कधी पारंपारीक पेहरावातील त्याच्या फोटोमुळे तो कायम चर्चेत असतो. आज त्याने त्याच्या लहानपणीचा गोंडस फोटो शेअर करून पुन्हा एकदा सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. विशेष म्हणजे तो या फोटोत चक्क फ्रिजमध्ये बसलाय! या फोटोसोबत त्याने कॅप्शन दिलंय की, फ्रिज पोटॅटो. त्याच्या या फोटोवर चाहत्यांसोबतच सेलिब्रेटीदेखील कमेंट्स करत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Fridge potato. Circa ‘88.

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09) on

'रमण राघव', 'मनमर्जिया', 'संजू', 'राझी' आणि 'उरीः द सर्जिकल स्ट्राईक' या सगळ्याच भूमिकांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर देखील यशस्वी ठरले आहेत. नुकताच त्याला उरीतील अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09) on

 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vicky kaushal shares his childhood photo on Instagram account