सासऱ्यांनाच कतरिनानं लावलं कामाला!, व्हिडिओ व्हायरल

Vicky Kaushal-Sham Kaushal (Father)
Vicky Kaushal-Sham Kaushal (Father)

बॉलीवूड अभिनेता विकी कौशलचे (Vicky Kaushal) वडील शाम कौशल (Sham Kaushal) यांचा बॅटल रोप वर्कआउट (Battle rope workout) करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इंस्टाग्रामवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये शाम कौशल जिममध्ये वर्कआउट करताना दिसत आहेत.

शाम कौशल हे अनेक दशकांपासून एक अनुभवी स्टंट समन्वयक म्हणून चित्रपटसृष्टीत ओळखले जातात. त्यांनी 80 च्या दशकापासून त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केली असून, अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), जॅकी श्रॉफ (Jackie Shroff), सलमान खान (Salman Khan), शाहरुख खान (Shahrukh Khan), हृतिक रोशन (Hritik Roshan) आणि इतर अनेक स्टार्ससाठी स्टंट (stunts) सीन्स कोरिओग्राफ केले आहेत.

काही आठवड्यांपूर्वी, अमिताभ बच्चन यांनी एक फोटो शेअर केला होता ज्यात ते एका चित्रपटाच्या सेटवर शाम कौशलना हॅंडशेक करताना दिसत आहेत. अमिताभ बच्चन आणि शाम कौशल यांनी भूतनाथ (Bhootnath), ब्लॅक (Black), अरमान (Armaan) यांसारख्या अनेक प्रोजेक्टवर एकत्र काम केले आहे.

फोटो शेअर करत अमिताभ बच्चन यांनी शाम कौशल यांना विक्की-कतरिनाच्या लग्नाबद्दल शुभेच्छा दिल्या. “विक्कीचे वडील, अॅक्शन डायरेक्टर, शाम कौशल यांच्यासोबत सेटवर, मी युगानुयुगे काम करत आहे, एक अतिशय नम्र प्रिय आणि प्रेमळ माणूस. खूप खूप अभिनंदन” अमिताभ बच्चन यांनी लिहिले.

Vicky Kaushal-Sham Kaushal (Father)
कोरोनामधुन बरे झाल्यावरअर्जुन कपूरने मलायकासाठी केलं हे सॉल्लिड काम

त्यानंतर दिग्दर्शक शाम कौशल यांनी देखील हा फोटो शेअर केला होता. शाम कौशल यांनी कृतज्ञता व्यक्त करत लिहिले की, “अमिताभ बच्चन, तुमच्या सर्व प्रेम आणि शुभेच्छांबद्दल धन्यवाद, मला तुमच्यासोबत गेल्या ४० वर्षांपासून, आधी स्टंटमॅन म्हणून आणि नंतर अॅक्शन डायरेक्टर म्हणून काम करण्यात धन्यता वाटत आहे. पाजी तुमच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे." पोस्टवर प्रतिक्रिया देताना विकी कौशल 'सर!' असे म्हणाला.

Vicky-Katrina
Vicky-KatrinaInstagram

विकी कौशल आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) यांनी राजस्थानमध्ये जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्यांसह एका जिव्हाळ्याच्या समारंभात लग्न केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com