esakal | साराला 'भाभी' म्हणून चिडवू लागले,अशी झाली तिची अवस्था ; पाहा व्हिडीओ
sakal

बोलून बातमी शोधा

video of fans calling Sara Ali Khan Bhabhi leaves Kartik Aaryan blushing

गेल्या काही दिवसांपासून सारा आणि कार्तिक यांचा बोलबाला पाहायला मिळतोय. कधी त्यांच्या क्युट इन्स्टाग्राम फोटोंमुळे तर, कधी एकत्र स्पॉट केल्यामुळे. आताही सारा आणि कार्तिक पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत आणि त्यांचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय.

साराला 'भाभी' म्हणून चिडवू लागले,अशी झाली तिची अवस्था ; पाहा व्हिडीओ

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई : व्हॅलेनटाइनला फक्त एक दिवस राहिला आहे आणि जिकडे तिकडे प्रेमाचा मौसम पाहायला मिळतो आहे. याच दिवसावर प्रेमाविषयीचे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. शिवाय व्हॅलेनटाइनच्या निमित्ताने बॉलिवूडच्या अनेक कपल्सची चर्चाही जोरदार सुरु आहे. सारा अली खानने काही वेळातच बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे. केदारनाथ आणि सिंबा हे दोन चित्रपट तिने केले आणि दोन्ही चित्रपट बॉक्सऑफिसवर सुपरहिट ठरले. साराचे आई वडील दोघेही सेलिब्रिटी आहेत आणि तरीही साराने स्वत:ला सिद्ध केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सारा आणि कार्तिक यांचा बोलबाला पाहायला मिळतोय. कधी त्यांच्या क्युट इन्स्टाग्राम फोटोंमुळे तर, कधी एकत्र स्पॉट केल्यामुळे. आताही सारा आणि कार्तिक पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत आणि त्यांचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. जाणून घ्या नक्की काय आहे ही भानगड ?

'व्हॅलेटाईन डे'निमित्त रितेश-जेनेलिया घेणार 'या' राजकीय जोडप्याची मुलाखत

सारा आणि अभिनेता कार्तिक आर्यन यांच्या लिंकअपच्या चर्चा बी-टाऊनमध्ये सुरु होत्या. कॉफी विथ करणमध्येही साराने कार्तिकला आवडण्याचा खुलासा केला होता. पण, काही दिवसांपूर्वीच या गोड कपलचा ब्रेकअप झाल्याची माहिती समोर आली. कधी डिनर डेट तर कधी वाढदिवस, दोघांना एकमेकांसोबत अनेकदा स्पॉट करण्यात आले. सोशल मीडियावरही य़ा दोघांनी एकमेकांसोबतचे क्युट फोटो शेअर केले. पण, कार्तिक आणि साराने त्यांच्या नात्याचा अधिकृतपणे कधीच खुलासा केला नाही.

त्यांचा आगामी सिनेमा 'लव्ह आज कल'  हा उद्या म्हणजे 14 फेब्रुवारीला रिलिज होत आहे. या सिनेमासाठी सारा आणि कार्तिक प्रमोशनसाठी अनेक ठिकाणी आणि कार्यक्रमांममध्ये जात आहेत. प्रमोशनमध्ये व्यस्त असतानाच, सारा आणि कार्तिक एका इव्हेंटसाठी आग्र्याला पोहोचले होते. पण, तिथे घडलेल्या प्रकाराने सारा आणि कार्तिक दोघेही थक्क झाले. या कार्यक्रमादरम्यानचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये असे दिसते की,  सारा आणि कार्तिक स्टेजवर आहेत. हे दोघं स्टेजवर येताच लोक साराला 'भाभी...भाभी...' असे चिडवायला लागतात. हे पाहून कार्तिक हसू लागतो. मात्र सारा चांगलीच शॉक होते. शिवाय या सर्व प्रकारामुळे ती अवघडल्यासारखी होते. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसतो आहे. 

 साराच्या ब्रेकअपनंतर त्याचं नाव न्यु कमर अनन्या पांडेशी जोडलं गेलं होतं. अनन्या पांडे कार्तिक हे दोघं ‘पत्नी पत्नी और वो’या चित्रपटातून एकत्र झळकले होते. पण, आता पुन्हा एकदा सारा आणि आर्य़नला एकत्र पाहून नेटकऱ्यांमध्ये उलट-सुलट चर्चा होत आहेत. सारा आणि कार्तिक नक्की डेट करत आहेत की नाही याचा खुलासा झालेला नाही. मात्र त्यांच्याा जोडीला चाहत्यांची चांगलीच पसंती आहे.

अग्गंबाई सासूबाई मधल्या शुभ्राची बॉलिवूडमध्ये एन्ट्री, पहिल्याच सिनेमात दिला बोल्ड सिन

दिग्दर्शक इम्तियाज अलीचा 'लव्ह आज कल' 14 फेब्रुवारीला म्हणजेच 'व्हॅलेंटाईन डे'ला आपल्या भेटीला येतोय. सारा अली खान आणि कार्तिक आर्यन या चित्रपटात मुख्य भूमिकेत असतील. 2009मध्ये आलेला सैफ अली खान आणि दीपिका पदुकोनचा पहिला 'लव्ह आज कल' आजही प्रेक्षकांचा आवडता आहे. त्यात इम्तियाज अली पुन्हा एकदा एक रेट्रो आणि सद्यस्थितीवर भाष्य करणारी लव्हस्टोरी घेऊन येत असल्याने त्याचे चाहते खूश आहेत.

loading image
go to top