इटलीतला साराचा फनी व्हिडीओ, न्हाव्यालाच केस कापायचं ट्रेनिंग देताना दिसली Sara ali Khan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video: Sara Ali Khan got her hair cut standing in Italy

इटलीतला साराचा फनी व्हिडीओ, न्हाव्यालाच केस कापायचं ट्रेनिंग देताना दिसली

सारा अली खान(Sara ali khan) सगळ्यांचीच फेव्हरेट आहे. तिचे व्हिडीओज आणि फोटोज हे एक महत्त्वाचं कारण आहे दिवसेंदिवस तिचे फॅन फॉलॉइंग वाढण्याचं असं म्हटलं तर चुकीचं ठरू नये. सारा नेहमीच सोशल मीडियावर आपल्या क्यूट अंदाजात व्हिडीओ शेअर करताना दिसते. प्रेक्षकांना तिच्या सर्वच अदा वेडं करुन सोडतात. साराचे व्हिडीओ पोस्ट झाले न झाले तोच व्हायरल होतात. एकदा असंच झालं,जेव्हा सारा इटलीतील एका सलून मध्ये पोहोचली. तिथला एक व्हिडीओ समोर आला आहे,ज्यामध्ये सारा न्हाव्याला क्यूट अंदाजात बोलत आपला हेअरकट करायला सांगत आहे. तिचा हा अंदाज लोकांना खूपच आवडला आहे.(Video: Sara Ali Khan got her hair cut standing in Italy)

सारा अली खानला जे फॉलो करतात त्यांना तिच्या प्रत्येक गोष्टीची अपडेट असते. साराला भरपूर फिरायला आवडतं आणि नव्या जागांना एक्सप्लोर करताना ती कुठेच कमी पडत नाही. आता तिचा एक नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. तो व्हिडीओ तिच्या इटलीच्या ट्रिपवरचा आहे. त्यामध्ये ती हेअर कट उभ्या उभ्याच करवून घेताना दिसतेय. हा व्हिडीओ इतकं मात्र सिद्ध करतो की ती सध्याची सगळ्यात कूल आणि स्ट्रीट स्मार्ट अभिनेत्री आहे.

हेही वाचा: Koffee WIth Karan7:'गोव्यात त्या रात्री..', सारा-जान्हवीचा कशाविषयी खुलासा?

या व्हिडीओत सारा एका सलून मध्ये जाऊन न्हाव्याला केस ट्रिम करायला सांगताना दिसते. यावरनं इतकं तर कळतंय की ती काही ठरवून हेअर कट करायला गेलेली नाही,तर इटलीच्या रस्त्यावरनं फिरता फिरता ती सहज म्हणून सलून मध्ये घुसली अन् काहीतरी करुन घ्यायचं म्हणून उभ्या उभ्याच केस ट्रिम करुन घेतले. आपल्या केसांना हातात पकडून तिनं न्हाव्याला व्यवस्थित सूचना देत तो हेअर कट करून घेतला आहे. बरं,आश्चर्याची गोष्ट अशी की न्हाव्याने देखील तिचं व्यवस्थित ऐकून तिला केस ट्रीम करुन दिलेयत.

हेही वाचा: Koffee with karan 7:सारानं केलं कन्फर्म, कार्तिकशी अफेअर- ब्रेकअपचा खुलासा?

व्हिडीओत केस ट्रूीम केल्यावर रीतसर न्हाव्याला पैसे देत,धन्यवाद मानत,स्वतःला आरशात न्याहाळत सारा शॉप बाहेर पडताना दिसते. साराच्या सिनेमांविषयी बोलायचं झालं तर ती लवकरच विकी कौशल सोबत लक्ष्मण उतेकरच्या सिनेमात दिसणार आहे. अद्याप या सिनेमाचं टायटल ठरलेलं नाही. फक्त या सिनेमाचं कथानक रोमॅंटिक आहे एवढी माहिती समोर आलेली आहे.

Web Title: Video Sara Ali Khan Got Her Hair Cut Standing In

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..