विद्युत जामवाल अॅक्शनला कंटाळला आणि घेतला हा निर्णय...

VIDYUT
VIDYUT

मुंबई : अभिनेता विद्युत जामवालने फोर्स या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले. त्यानंतर त्याने `कमांडो`, `कमांडो २` व `कमांडो ३` या चित्रपटांबरोबरच `जंगली` या चित्रपटातही काम केले. `जंगली` या चित्रपटात त्याची नायिका मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत होती. थरारक आणि रोमहर्षक अशी अॅक्शन या चित्रपटात होती. एका पशुचिकित्सकाची भूमिका त्याने केली होती. मागील वर्षी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आता एक अॅक्शन हिरो म्हणून विद्युतची ओळख निर्माण झाली आहे. लहानपणापासूनच त्याला अॅक्शनची आवड आहे आणि तेव्हापासूनच त्याने मार्शल आर्टस् शिकण्यास सुरुवात केली आणि त्यात तो तरबेज झाला आहे. त्यामुळे अॅक्शन त्याला खूप आवडते. परंतु आता तो तेच तेच करून कंटाळला आहे आणि काही तरी नवीन करण्याच्या उद्देशाने रोमँटिक चित्रपट स्वीकारला आहे. `खुदा हाफिज` या चित्रपटात तो रोमान्स करताना दिसणार आहे.

केवळ हिंदी चित्रपटातच नाही तर तमीळ आणि तेलुगू चित्रपटातही त्याने काम केले आहे. साऊथ तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत त्याची घोडदौड सुरू आहे. मात्र आता विद्युत रोमान्स करताना दिसणार आहे. लवकरच तो 'खुदा हाफिज' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा एक रोमँटिक चित्रपट आहे.  तो प्रेक्षकांसमोर नव्या अंदाजात येणार आहे. चित्रपटाची कथा सन २००९ साली आलेल्या मंदीच्या काळातील आहे.

मंदीचा तो काळ असतो आणि त्यातच या चित्रपटातील तरुण लग्न करण्याचा निर्णय घेतो. मग या कपलच्या जीवनात कोणते आणि कसे बदल होतात...त्यांना कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते ही कथा आहे. एका कपल्सच्या आयुष्यावर बेतलेली ही कथा आहे. अॅक्शन आणि रोमान्स या चित्रपटात पाहायला मिळेल. विद्युतसोबत या चित्रपटात अभिनेत्री शिवलिका ओबेरॉय मुख्य भूमिकेत झळकणार आहे. चित्रपटाचे चित्रीकरण लखनऊ, मुंबई आणि उज्बेकिस्तान येथे करण्यात आले आहे. फारुख कबीर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याच्याच प्रतिक्षेत सिनेरसिक आहेत. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com