"कमांडो' भेटणार रियल कमांडोंना 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

अभिनेता विद्युत जामवाल स्टंट्‌स आणि ऍक्‍शनमुळे बॉलीवूडमध्ये "ऍक्‍शन हिरो' म्हणून ओळखला जातो. "कमांडो 2'मध्ये त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली असून पुन्हा एकदा ऍक्‍शन करून सर्वांना अचंबित करणार आहे. यातील सर्व ऍक्‍शन सीन त्याने स्वत:च केले आहेत आणि त्यासाठी खूप परिश्रमही घेतलेत. आता म्हणे, विद्युत जोधपूरमध्ये खऱ्या सैनिकांना भेटायला जाणारेय. भारतीय जवान सीमेवर अनेक समस्यांचा सामना करीत आपली सगळ्यांची रक्षा करतात. "कमांडो 2' मधील विद्युतचा रोलही तसाच आहे. यासाठी तो जोधपूरमधील कमांडो कॅंपमध्ये जाऊन सैनिकांसोबत काही वेळ व्यतीत करणार आहे आणि डिफेन्सचं प्रशिक्षण घेणार आहे.

अभिनेता विद्युत जामवाल स्टंट्‌स आणि ऍक्‍शनमुळे बॉलीवूडमध्ये "ऍक्‍शन हिरो' म्हणून ओळखला जातो. "कमांडो 2'मध्ये त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली असून पुन्हा एकदा ऍक्‍शन करून सर्वांना अचंबित करणार आहे. यातील सर्व ऍक्‍शन सीन त्याने स्वत:च केले आहेत आणि त्यासाठी खूप परिश्रमही घेतलेत. आता म्हणे, विद्युत जोधपूरमध्ये खऱ्या सैनिकांना भेटायला जाणारेय. भारतीय जवान सीमेवर अनेक समस्यांचा सामना करीत आपली सगळ्यांची रक्षा करतात. "कमांडो 2' मधील विद्युतचा रोलही तसाच आहे. यासाठी तो जोधपूरमधील कमांडो कॅंपमध्ये जाऊन सैनिकांसोबत काही वेळ व्यतीत करणार आहे आणि डिफेन्सचं प्रशिक्षण घेणार आहे. हा क्षण विद्युतसाठी अभिमानास्पद आणि अविस्मरणीय असणार आहे. 

Web Title: VIDYUT JAMWAL MEETS REAL COMMANDOS