Vijay Setupathi : विजय सेतुपतिला मिळाली धमकी, म्हणून तर त्यानं....! घडलं तरी काय?

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या जवान चित्रपटामध्ये विजय सेतुपतिनं खलनायकाची भूमिका साकारली होती.
Vijay Setupathi refused to work in Muttiah Murlitharan Biopic 800
Vijay Setupathi refused to work in Muttiah Murlitharan Biopic 800esakal

Vijay Setupathi refused to work in Muttiah Murlitharan Biopic 800 : साऊथचा सुपरस्टार विजय सेतुपतिची गोष्टच वेगळी आहे. त्यानं गेल्या दीड दशकांपासून आपल्या नावाची क्रेझ तयार केली आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या जवान चित्रपटामध्ये विजय सेतुपतिनं खलनायकाची भूमिका साकारली होती. त्यात तो चांगलाच भाव खाऊन गेला होता. (लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर... फॉलो करण्यासाठी या लिंकवर करा क्लिक)

यासगळ्यात आणखी एका कारणामुळे विजय सेतुपति हा चर्चेत आला आहे. तो चित्रपट करण्यासाठी मोठी किंमत चुकवावी लागली होती. त्याचे काय आहे की, प्रख्यात श्रीलंकन खेळाडू मुथैय्या मुरलीधरनच्या आयुष्यावर बायोपिक येत आहे. काही दिवसांपूर्वी त्याचा ट्रेलरही आला होता. त्या खास सोहळ्यासाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि श्रीलंकेचा महान फलंदाज सनथ जयसुर्याही उपस्थित होते.

Also Read - नांव Fire - पण पुढचं आयुष्य 'थंडा थंडा, कूल कूल'

असं म्हटलं जातं की, मुरलीधरनच्या त्या बायोपिकमध्ये विजय सेतुपति काम करणार होता. मात्र त्याला काही राजकीय नेत्यांकडून धमकीचे फोन गेले आणि त्यानंतर त्यानं त्या चित्रपटातून माघार घेतली. अखेर त्यानं सारख्या येणाऱ्या त्या फोनला कंटाळून तो चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र ही गोष्ट जेव्हा त्याच्या चाहत्यांना कळल्यानंतर त्यांना मोठा धक्का बसला होता. या गोष्टीचा खुलासा खुद्द मुरलीधरननं केला आहे.

मुरलीधरननं झुमला दिलेल्या मुलाखतीमध्ये आपल्या बायोपिकविषयी अनेक गोष्टी शेयर केल्या आहेत. त्याच्या बायोपिकचे नाव ८०० असे आहे. मी स्वत विजयचा मोठा फॅन आहे. आणि मला खूप वाटायचं की त्यानं माझ्या बायोपिकमध्ये काम करावं. तोही तयार झाला होता. मात्र काही नेत्यांच्या धमक्यांमुळे त्याला माघार घ्यावी लागली. विजयनं स्क्रिप्ट वाचल्यानंतर तो त्यात काम करण्यास राजी झाला होता.

Vijay Setupathi refused to work in Muttiah Murlitharan Biopic 800
The Vaccine War Twitter Review : आपण आपल्या 'रियल हिरों'चे कौतुक कधी करणार अग्निहोत्रींनी दिला मोठा दणका!

मुरलीधरन त्या मुलाखतीमध्ये म्हणाला की, काही राजकीय नेत्यांना वाटत नव्हते विजयनं त्या चित्रपटामध्ये काम करावे. ८०० हा चित्रपट क्रीडा विषयाशी संबंधित चित्रपट आहे. ज्याचा आणि राजकारणाशी काही एक संबंध नाही. मात्र सातत्यानं विजयला मोठ्या प्रमाणावर धमक्या मिळत होत्या. आणि मला त्याचा परिणाम विजयच्या करिअर होईल अशी भीती होती. त्यामुळे मी देखील त्याला फार आग्रह केला नाही.

Vijay Setupathi refused to work in Muttiah Murlitharan Biopic 800
Nana Patekar : 'आजकालचे अभिनेते हे...' नाना पाटेकर पुन्हा बोलले! जुन्या काळातील दिग्गजांच्या आठवणींना दिला उजाळा

मुरलीधरनच्या आयुष्यावर आधारित बायोपिक हा येत्या ८ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याची मोठी क्रेझ आहे. चाहत्यांना आणि क्रिकेटविश्वातील अनेक खेळाडूंना देखील त्याची मोठी उत्सुकता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com