Vijay Sethupathi Birthday: 'तुझ्यासारखा दुसरा कुणी हिरो नाही पाहिला'! साक्षात कमल हासन यांनी थोपटली होती पाठ

आता विजयचा कतरिनासोबत मेरी ख्रिसमस नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
Happy Birthday Vijay Sethupathy
Happy Birthday Vijay Sethupathyesakal

Happy Birthday Vijay Sethupathy : त्याचं दिसणं, बोलणं आणि अभिनय हा नेहमीच अनेकांच्या चर्चेचा विषय राहिला. ज्यांनी त्याचा ९६ नावाचा चित्रपट पाहिला त्यातून त्यांना तो वेगळाच भासला. असा अभिनय आणि असा अभिनेता असू शकतो. यावर त्याचे चाहते विश्वास ठेऊ लागले. पुढे आणखी काही दिवसांनंतर तो अॅक्शनपटांमध्ये दिसला त्यावेळी त्याचा राऊडी लूक हा अनेकांना आपल्या रोजच्या परिचयातील चेहऱ्यासारखा वाटला होता.

ही सगळी चर्चा आहे ती साऊथ सिनेविश्वातील विजय सेतुपतिची. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ तो साऊथच्या चित्रपट विश्वात सक्रिय आहे. त्यात त्यानं प्रचंड लोकप्रियता मिळवल्याचे दिसते. आज विजय सेतुपतिचा जन्मदिवस आहे. त्यानिमित्तानं त्याच्या लाखो चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केल्याचे दिसून आले आहे. किंग खानच्या जवानमध्ये विजय हा व्हिलनच्या रुपात दिसला होता. बॉलीवूडमधील त्याचं हे पदार्पण अनेकांच्या कौतुकाचा विषय होता.

यापूर्वी विजयनं ओटीटीवर शाहीद कपूरसोबत फर्जी नावाच्या मालिकेत डेब्यू केलं होतं. त्यातही त्यानं साकारलेली पोलीस अधिकाऱ्याची भूमिका लोकप्रिय ठरली होती. त्याच्या वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपटांमुळे तो नेहमीच चर्चेचा विषय राहिला. साऊथचे प्रख्यात अभिनेते कमल हासन यांनी एका कार्यक्रमात विजयचं केलेलं ते कौतुक चाहत्यांच्या चर्चेचा विषय होता. विजय सारखा दुसरा हिरो पाहिला नाही. असे ते म्हणाले होते. या अभिनेत्याचे कौतुक वाटते. अशी हासन यांची प्रतिक्रिया होती.

आता विजयचा कतरिनासोबत मेरी ख्रिसमस नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. बदलापूर, अंधाधून चित्रपटाचा दिग्दर्शक श्रीराम राघवनच्या या चित्रपटानं प्रेक्षकांच्या मनाची पकड घेतल्याचे दिसून आले आहे. जाणकार प्रेक्षक, समीक्षक यांनी देखील या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. बऱ्याच दिवसांपासून विजयच्या या चित्रपटाची चाहते वाट पाहत होते.

ज्यांनी विजयचा मास्टर, विक्रम आणि जवान पाहिला असेल त्यांना तो किती प्रभावी अभिनेता आहे हे कळून येईल. १६ जानेवारी १९७८ रोजी जन्म झालेल्या विजयचा जन्म तामिळनाडू राज्यात झाला. त्याला आजवर राष्ट्रीय पुरस्कार, दोन फिल्मफेयर पुरस्कार आणि दोन तामिळनाडू स्टेट फिल्म पुरस्कारानं गौरविण्यात आले आहे. अशा या अभिनेत्याच्या सुपर डिलक्स चित्रपटाला जगभरातील महोत्सवांमध्ये गौरविण्यात आले होते.

Happy Birthday Vijay Sethupathy
Vijay Setupathi : 'काही वेळेला राजकारण होतचं, माझा 'सुपर डिलक्स' ऑस्करला जायला हवा होता'!

साधा अकाउंटट होता...

विजयच्या बाबत एक गोष्ट आवर्जून सांगितली जाते ती म्हणजे तो चित्रपटात येण्यापूर्वी दुबईमध्ये अकाउंटट म्हणून नोकरीला होता. त्यानंतर ती नोकरी सोडून चित्रपटात येण्याचा त्यानं निर्णय घेतला. त्यात तो मेहनतीनं यशस्वीही झाला. त्यानं आजवर तमिळ, तेलुगू, कन्नड, हिंदी सारख्या भाषेतील अनेक चित्रपटांत काम केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com