एक हट्टी मुलगी हे नाटक लवकरच रंगमंचावर

टीम इ सकाळ
मंगळवार, 20 जून 2017

विजय तेंडुलकर लिखित एक हट्टी मुलगी हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर येणार आहे. सुयोग ही नाट्यसंस्था हे नाटक मंचावर आणत असून या नाटकात मकरंद अनासपुरे यांची मुख्य भूमिका असणार आहे. 

पुणे : विजय तेंडुलकर लिखित एक हट्टी मुलगी हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर येणार आहे. सुयोग ही नाट्यसंस्था हे नाटक मंचावर आणत असून या नाटकात मकरंद अनासपुरे यांची मुख्य भूमिका असणार आहे. 

या नाटकाच्या तालमीला अद्याप सुरुवात झाली नसून साधारण सप्टेंबरमध्ये हे नाटक लोकांना पाहता येईल. विजय तेंडुलकरांच्या लेखणीची भूरळ सतत अनेक दिग्दर्शकांना पडत असते. आता बर्याच कालावधीनंतर तेंडुलकरांचे नाटक व्यावसाचिक रंगमंचावर येईल. 

Web Title: Vijay Tendulkar new drama esakal news