
Satish Kaushik Death : 'रशियन गर्ल बोलवून सतीश कौशिकला ब्लू पिल्स देऊ, 15 कोटी…'; महिलेच्या आरोपांनी खळबळ
अभिनेता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या मृत्यूच्या मागे कट कारस्थान असल्याची चर्चेने खळबळ उडाली आहे. कौशिक यांच्या मृत्यूनंतर एका महिलेने तिच्या पती विकास मालू या उद्योगपतीवर यात सहभाग असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
दिल्ली पोलिसांत दिलेल्या तक्रारीत दावा करण्यात आला आहे की, विकास मालू इन्वेस्टमेंटसाठी सतीश कौशिक यांच्याकडून १५ कोटी रुपये घेतले होते. त्यानंतर हे पैसे कोरोना काळात बुडाले त्यामुळे सतिश कोशिक यांना संपवण्याचा कट रचण्यात आला.
दिल्ली पोलिस कमिश्नर संजय अरोरा यांना पाठवण्यात आलेल्या तक्रारीत उद्योजक विकास मालू यांची दूरसी पत्नीने सांगितले आहे की, विकास मालू सोबत १३ मार्च २०१९ रोजी लग्न झालं होतं. विकासने माझी ओळख अभिनेते सतीश कौशिक यांच्याशी करून दिली होती. ते भारत आणि दुबईत आमच्या घरी सतत येत असत.
२३ ऑगस्ट २०२२ रोजी सतीश कैशिक आमच्या दुबईतील घरी आले होते. यादरम्यान त्यांनी विकासकडे त्यांचे १५ कोटी रुपये परत मागीतले होते. मी त्या वेळी ड्रॉइंग रुममध्येच होते. जेथे सतीश कौशिक आणि विकास यांच्यात पैश्यांवरून वाद झाला होता. तेव्हा सतिश कौशिक यांनी त्यांना पैशांची खूप निकड असल्याचे सांगितले होते. सतीश कौशिक यांनी तीन वर्षांपूर्वी १५ कोटी दिले होते. पण विकासने ते पैसे कुठे गुंतवले तर नाहीतच तसेच तो ते परत देखील करत नव्हता. तो स्वतःच्या मित्र सतीश यांची फसवणूक करत होता. आज तक हिंदीने याबद्दलचे वृत्त दिले आहे.
हेही वाचा - देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

या महिलेने आरोप केला री, माझ्या नवऱ्याने सतीश कौशिक यांना त्यांचे १५ कोटी रुपये लवकरच भारतात येऊन परत करेल असे सांगितले होते. त्याच रात्री विकास जेव्हा बेडरुममध्ये आले तेव्हा मी विचारलं की, ते सतीश कौशिक कोणते पैसे मागत होते? तेव्हा विकास म्हणाला की, कधीतरी रशियन गर्ल बोलवून ब्लू पिल्सचा ओव्हर डोस देऊ, हा तसाच मरून जाईल. याला कोण पैसे परत करणार आहे.
दुसऱ्या दिवशी म्हणजेच २४ ऑगस्ट २०२२ रोजी सतीश कौशिक यांनी पुन्हा त्यांचे १५ कोटी मागितले यावर विकास मालू भडकला आणि कौशिक यांना म्हणाला की, तुला एकदाच सांगितलंय की नुकसान झालं आहे, भारतात गेल्यावर तुझे पैसे परत करेल. आणि ज्यास्त गोंधळ घालू नको. तू पेसे कॅश मध्ये दिले आहेस. त्यामुळे तू कायदेशीर कारवाई करू शकत नाही.
सतीश कौशिक हे ऐकून सुन्न झाले, त्यांनी विकास याला तेव्हांच सांगितलं की तू मला १५ कोटी रुपयांचं वचनपत्र दिलं आहे. त्याच रात्री विकास मालू ने स्वतः मला सांगितलं की, सतीश कौशिकचा लवकरच इलाज करावा लागेल नाहीतर हा गप्प बसणार नाही.
महिलेने गंभीर आरोप करत पुढे लिहीले की, विकास मालू याच्याकडे सर्व प्रकारचे ड्रग्स गांजा, कोकीन, हीरोइन, ब्लू पिल्स, पिंक पिल्स, एमडीएमए, जीएसबी इत्यादीचे मोठे कलेक्शन आहे. जो तो आपल्या दिल्ली येथील फार्म हाऊसमध्ये होणाऱ्या पार्ट्यामध्ये वापरतो. मी जेव्हा कधी विचारणा केली की ड्रग्ज आणि पिल्स कोणासाठी आहेत तर तो तूला नाही कळणार असं उत्तर देत असे.
विकास मालूच्या पत्नीने तक्रारीत लिहीले आहे की विकास मालू याचे पोलिस आधिकारी आणि राजकिय नेत्यांशी चांगले संबंध आहेत. तो स्वतःला वाचवण्यासाठी याचा उपयोग करेल. विकास गुन्हेगार आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत आणि तो तुरूंगात देखील गेला आहे. त्यामुळे या गोष्टी लक्षात घेता सतीश कौशिक यांच्या मृत्यूप्रकरणात निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. असेही महिलेने म्हटले आहे.
इतकेच नाही तर महिलेने आरोप केला आहे की विकास मालूचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध आहेत आणि तो देशविरोधी कामांमध्ये सहभागी आहे. यासोबत विकास मालूच्या पत्नीने तक्रारीसोबत फोटो देखील पोलिसांना दिला आहे. महिलेचा दावा आहे की हा फोटो विकास मालू याने आयोजित केलेल्या पार्टीचा आहे, ज्यामध्ये अभिनेते सतीश कौशिक देखील आहेत आणि दाऊदचा मुलगा अनस देखील सहभागी झाला होता.
दुसरी पत्नीने विकास मालू यांच्यावर रेप केस देखील दाखल केली आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.