'घोस्ट' झाला रिलीज अन् सुरू झाली सिक्वेलची चर्चा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

बॉलिवूडमध्ये अनेक भयपटांची ओळख करून देणारे दिग्दर्शक म्हणजे विक्रम भट्ट. त्यांनी "1920', "राज', "मिस्टर एक्‍स', "हाँटेड' सारखे अनेक भयपटांचे दिग्दर्शन केले आहे. आता ते "घोस्ट' हा आणखी एक भयपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आले आहेत.

या चित्रपटात छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री शनाया इरानी मुख्य भूमिकेत आहे. तर तिच्यासोबत अभिनेता शिवम भार्गव आणि गॅरी हेरॉन ही या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. दिग्दर्शक विक्रम स्वतःही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. चित्रपटाचे चित्रीकरण लंडन येथे करण्यात आले  असून चित्रपटाची कथा एका सत्यघटनेवर आधारित आहे.

चित्रपटात शिवम एका नेत्यांची भूमिका साकारत आहे तर शनाया एका वकीलची भूमिका साकारत आहे. चित्रपटाची निर्मीती वासू भगनानी यांनी केली आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर लगेचच या चित्रपटाचा सिक्वेल येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे चाहत्यांची हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता आणि त्याचबरोबर सिक्‍वेलची उत्सुकता वाढली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vikram Bhatt s Ghost released today