Death Rumours : 'या' फेमस व्यक्तींच्या मृत्यूच्या पसरल्या होत्या अफवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Udit Narayan

Death Rumours : 'या' फेमस व्यक्तींच्या मृत्यूच्या पसरल्या होत्या अफवा

Death Rumours : बॉलीवूड आणि मराठी इंडस्ट्रीत आपल्या अभिनयामुळे ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती अत्यावस्थ असून, त्यांच्यावर पुण्यातील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

दरम्यान, कालपासून अनेक माध्यमातून विक्रम गोखले यांचे निधन झाल्याचे वृत्त काही माध्यमांनी प्रसिद्ध केले आहे. एवढेच नव्हे तर, काही दिग्गज व्यक्तींनीदेखील गोखले यांना श्रद्धांजली वाहली. या सर्वामध्ये गोखले यांच्या कुटुंबियांकडून पुढे येत विक्रम गोखले यांच्या निधनाचे वृत्त फेटाळत त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. आज आम्ही तुम्हाला आशाच काही चर्चेतील व्यक्तींच्या निधनांबद्दलच्या अफवांबाबत माहिती सांगणार आहोत.

हेही वाचा: 'भिकार मालिका पाहणं बंद करा'..विक्रम गोखले पुन्हा गरजले

उदित नारायण

काही दिवसांपूर्वी गायक उदित नारायण यांच्या निधनाच्या अफवेने चाहत्यांमध्ये खलबळ उडाली होती. ह्रदयविकाराच्या झटक्याने उदित नारायण यांचे निधन झाल्याची अफवा सोशल मीडियात पसरली होती. यानंतर अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. मात्र, ही केवळ अफवाच असल्याचे नंतर समोर आले होते.

फरीदा जलाल

बॉलिवूडची ज्येष्ठ अभिनेत्री फरीदा जलाल यांच्या मृत्यूची बातमी अचानक सोशल मीडियावर वायरल झाल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. चाहत्यांहीदेखील या घटनेची शहानिशा न करता त्यांना श्रध्दांजली वाहण्यास सुरूवात केली होती.

हेही वाचा: माझं कोणी काही वाकडं करू शकत नाही; विक्रम गोखले

Mr Bean Rivelary

Mr Bean Rivelary

छोटा राजन

'अंडरवर्ल्ड डॉन' अशी ओळख असलेला कुख्यात गँगस्टर छोटा राजन उर्फ राजेंद्र निकाळजे याच्यादेखील निधनाची अफवा पसरली होती. कोरोनाची लागण झाल्यानंतर छोटा राजला दिल्लीतील रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. त्यादरम्यान त्याच्या निधनाची अफवा पसरली होती.

मिस्टर बिन

मिस्टर बीन हे आयकॉनिक पात्र साकारणारे लोकप्रिय अभिनेते रोवन अ‍ॅटकिंसन यांचे कार अपघातात निधनाच्या अफवेनेदेखील अनेकांना धक्का बसला होता. मात्र, ही देखील अफवा असल्याचे नंतर समोर आले होते.

हेही वाचा: 'मी माझ्या बापाचे नाव लावतो'; विक्रम गोखले कुणाबाबत म्हणाले?

putin

putin

व्लादिमीर पुतिन

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची प्रकृती काही काळापूर्वी ठिक नसल्याची चर्चा सुरू होती. अशातच एक दिवस ब्रिटनची गुप्तचर यंत्रणा MI6 च्या प्रमुखांनी व्लादिमीर पुतीन यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला होता. पुतिन यांचा गंभीर आजारामुळे मृत्यू झाल्याची अफवा पसरली होती. मात्र, हे वृत्तदेखील अफवा असल्याचे नंतर स्पष्ट झाले.

मुकेश खन्ना

सुप्रसिद्ध अभिनेते मुकेश खन्ना यांच्या निधनाची अफवा आज दिवसभर वेगाने पसरली होती. मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्यांच्या कथित निधनाच्या बातमीने अनेकांना धक्का बसला होता. एका व्यक्तीने सोशल मीडियावर त्यांच्या मृत्यूची बातमी पोस्ट केली होती. मात्र, स्वत: मुकेश खन्ना यांनी एका व्हिडिओद्वारे ही अफवा असल्याचे जाहीर केले होते.

हेही वाचा: लतादीदींचा स्वर अद्भुत आणि अलौकिक - विक्रम गोखले;पाहा व्हिडीओ

मीनाक्षी शेषाद्री

काही दिवसांपूर्वी नव्वदच्या दशकांत चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या मीनाक्षी शेषाद्रीच्या निधनाच्यादेखील अफवा पसरल्या होत्या. मीनाक्षीने एका बँकरसोबत लग्न केले असून, आता ती अमेरिकेत स्थायिक आहे.