वाढदिनी विक्रम गोखले यांचे 'लाख'मोलाचे पाऊल!

सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

मराठी, हिंदी मनोरंजनसृष्टीत आपल्या अभिनयाने दबदबा निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचा आज वाढदिवस. या वाढदिवशी गोखले यांनी एक आगळा धडा घालून दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर यांची माहिती दिल्यानंतर गोखले यांनी उचललेलं स्तुत्य पाऊल लोकांच्या लक्षा आलं. 

मुंबई : मराठी, हिंदी मनोरंजनसृष्टीत आपल्या अभिनयाने दबदबा निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचा आज वाढदिवस. या वाढदिवशी गोखले यांनी एक आगळा धडा घालून दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर यांची माहिती दिल्यानंतर गोखले यांनी उचललेलं स्तुत्य पाऊल लोकांच्या लक्षा आलं. 

अग्निपथ, भूलभुलैय्या, बॅरिस्टर, जावई माझा भला, नळत नकळत, के दिल अभी भरा नही, नटसम्राट, हम दिल दे चुके सनम अशा हिंदी, मराठी चित्रपट, नाटक, मालिकांमधून आपला ठसा उमटवलेले अभिनेते विक्रम गोखले यांचा आज वाढदिवस. या वाढदिवशी गोखले यांनी एक लाखाचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्य निधीला सुपूर्द केला. आज मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हा चेक त्यांना देण्यात आला. याची त्यांनी कोठेही वाच्यता केली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र ट्विटरवरून त्यांचे आभार मानले.  

Web Title: vikram gokhale actor devendra fadanvis cm maharashtra esakal news