Vikram Gokhale Demise: ''ते सेटवर आले की...'', विक्रम गोखले यांच्या शेवटच्या मालिकेच्या आठवणी

विक्रम गोखले यांनी 'तुझेच मी गीत गात आहे' या मराठी मालिकेत अभिजित खांडकेकर सोबत काम केले आहे.
Vikram Gokhale And Abhijeet Khandkekar worked together in Marathi Serial, Tuzech me geet gaat aahe...
Vikram Gokhale And Abhijeet Khandkekar worked together in Marathi Serial, Tuzech me geet gaat aahe...Esakal

Vikram Gokhale Demise: मराठी सोबतच बॉलीवूडमध्येही अभिनयाच्या माध्यमातून आपला दरारा निर्माण करणारे विक्रम गोखले यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी दीर्घ आजारानं निधन झालं. पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात ते गेल्या १५ ते २० दिवसांपासून उपचार घेत होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. पण अखेर त्यांची मृत्युशी सुरू असलेली झुंज आज २६ नोव्हेंबर रोजी थांबली अन् त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विक्रम गोखले यांच्या निधनानंतर त्यांच्या चाहत्यांसोबत अनेक कलाकार मंडळींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. विक्रम गोखले यांच्या शेवटच्या मालिकेत त्यांच्यासोबत काम करणाऱ्या अभिजित खांडकेकरनं सेटवरचा अनुभव शेअर केला आहे.(Vikram Gokhale And Abhijeet Khandkekar worked together in Marathi Serial, Tuzech me geet gaat aahe...)

अभिजित म्हणाला,'' मी स्वतःला भाग्यवान समजतो की माझा पहिला वहिला सिनेमा 'महाराष्ट्र ढाबा भटिंडा' मध्ये विक्रम गोखले यांनी माझ्या वडीलांची भूमिका केली होती. त्यानंतर १० वर्षांनी माझी मालिका 'तुझेच मी गीत गात आहे' मध्ये महिन्याभरापूर्वीच मी त्यांच्यासोबत काम केलं. त्यांनी माझ्या गुरुजींची भूमिका साकारली होती. तेव्हा खूप आनंद झाला होता.

तीन दिवस ते आमच्यासोबत शूट करत होते. पण त्या दिवसांत सेटवरचं वातावरण बदलून गेलं होतं. सेटवर आदरयुक्त भीती होती. पण मुद्दा हा आहे की त्यांच्या वागण्यात मी किती मोठा आहे हा भाव कधीच नव्हता. त्यांच्या सहवासात राहिल्यावर खूप शिकायला मिळालं. खूप विषयांवर गप्पा मारल्या.

अभिनय,त्यातील बारकावे,कांगोरे, त्यांचे अनुभव,त्यांनी वाचलेली पुस्तकं ते खूप साधेपणाने सांगायचे. महिना झाला असेल त्यांच्याबरोबर शूट करून त्यावेळेला त्यांची उत्तम तब्येत होती. आवडीनं सगळे पदार्थ खायचे. मस्त वेळ घालवायचे. खरंतर त्यांच्याकडे बघून खूप उत्साह वाटायचा कारण डेलीसोपच्या दिवसभराच्या शूटमध्ये देखील त्यांची एनर्जी टिकून असायची''.

Vikram Gokhale And Abhijeet Khandkekar worked together in Marathi Serial, Tuzech me geet gaat aahe...
Urfi Javed: उर्फीच्या दुबई प्रवेशावर बंदी; अतरंगी कपडे घालते म्हणून नाही तर यामागे भलतंच कारण...

''मला अजूनही वाटतं विक्रम काकांची बातमी खोटी असावी. कारण ते आपल्यामध्ये नाहीत हे स्विकारणं अवघड आहे.कारण विक्रम गोखले नावाची एक व्यक्ति गेली नाही तर एक इन्स्टिट्युट होते ते. त्यांनी इतकं काम करून ठेवलंय आणि जितकं आम्हाला त्यांच्याकडून शिकता आलंय ते सारं पुढच्या पिढ्यांना शिकता येईल. त्यांच्या जाण्यानं ते इथेच थांबणार नाही तर पुढच्या पिढ्यांना त्यांचे काम कायम प्रेरणा देत राहिल.

विक्रम काकांचे नाटक 'बॅरिस्टर',आणि बॉलीवूडमध्ये 'हम दिल दे चुके सनम' या माझ्या सगळ्यात जास्त आवडत्या कलाकृती. हम दिल दे चुके सनम मध्ये तर सलमान ,ऐश्वर्या एकीकडे आणि त्यांचा दरारा दुसरीकडे. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांना तर आंतरराष्ट्रीय पारितोषिकं मिळाली. त्यामुळे त्यांच्या जाण्यानं केवळ मराठी,हिंदी नाही तर सबंध भारतीय मनोरंजनसृष्टीसाठी मोठं नुकसान आहे असं मी म्हणेन.

Vikram Gokhale And Abhijeet Khandkekar worked together in Marathi Serial, Tuzech me geet gaat aahe...
Manasi Naik: 'माझी मुलींना हात जोडून विनंती...'; लग्न करताना कुठे चुकलं यावर स्पष्टच बोलली मानसी नाईक

''तुझेच मी गीत गात आहे या आमच्या मालिकेच्या सेटवर मी पूर्णवेळ त्यांच्या आजुबाजूला होतो विद्यार्थ्याच्या भूमिकेत मी असायचो. ते त्यांच्या अभिनयशैलीसाठी जसे प्रसिद्ध होते,त्याच्यातील एक बाब म्हणजे ते घेत असलेले मोठे पॉजेस. नेमकं असं झालं की आमच्या या मालिकेत एका सीनमध्ये एक मोठं वाक्य होतं ,ते माझ्याशी मोठे पॉज घेत त्यांच्या नेहमीच्या खास शैलीत संवाद बोलायचे , तेव्हा मी निवांत वेळ घेऊन मग माझं वाक्य घ्यायचो''.

''तेव्हा त्यांनी मला बोलावलं आणि म्हणाले, ''छान काम करतोस'', तेव्हा मला काही सुचलं नाही काय बोलू. ते म्हणाले, 'आजकाल ऐकणं फार कमी झालंय आणि तू चांगलं करतोस ते,...'. माझ्या सारख्या अत्यंत छोट्या अभिनेत्याला त्यांनी काय चांगलं,काय नाही आहे हे नसतं सागितलं तरी काही फरक पडला नसता त्यांना. पण त्यांच्या त्या वागण्यानं मी मात्र खूप सहज झालो त्यांच्यासोबत.''

''मला आठवतंय त्यांना गुडघ्यांमुळे उठायला-बसायला त्रास व्हायचा. पण मी त्यांच्या पायाशी बसून असायचो. त्या वेळेत त्यांच्याकडे असलेले कॅमेरे,बंदुका याविषयी गप्पा मारायचो. त्यांच्या त्या मनमोकळ्या वागण्यानं माझ्या मनातील त्यांच्याविषयीची भीती पळाली आणि आदर मनात राहिला...''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com