विक्रमचा झंझावात! 3 दिवसांत 150 कोटी, 'पृथ्वीराजनं' टाकली मान

टॉलीवूडच्या चित्रपटांपुढे अजुनही (Entertainment News) बॉलीवूडच्या चित्रपटांना मोठं यश मिळवण्यासाठी झगडावे लागत आहे.
Vikram Kamal Haasan Movie
Vikram Kamal Haasan Movie esakal

Vikram Box Office Collection Day 3: टॉलीवूडच्या चित्रपटांपुढे अजुनही (Entertainment News) बॉलीवूडच्या चित्रपटांना मोठं यश मिळवण्यासाठी झगडावे लागत आहे. गेल्या काही महिन्यांपासून बॉलीवूडला टॉलीवूडनं नाकीनऊ आणले (Vikram Movie) आहे. त्यांचे एकाहून एक सरस असे चित्रपट प्रदर्शित होऊन त्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळताना दिसत आहे. गेल्य़ा वर्षी अल्लु (Pushpa Movie) अर्जुनच्या पुष्पाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. त्यानंतर राजामौली यांच्या आरआरआरनं थिएटरमध्ये धुमाकुळ घातला होता. प्रशांत नील याच्या (Samrat Prithviraj) केजीएफच्या दुसऱ्या चित्रपटानं तर बॉलीवूडच्या पायाखालची (Bollywood News) जमीनच सरकल्याचे दिसून आले आहे. यासगळ्यात आता कमल हासन यांच्या विक्रमनं बॉक्स ऑफिसवर कमाईचे विक्रम रचण्यास सुरुवात केली आहे. तीन दिवसांत या चित्रपटानं भारतात 100 तर जगभरातून दीडशे कोटी (Akshay Kumar Movies) रुपयांची कमाई केली आहे.

विक्रम बरोबरच बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा सम्राट पृथ्वीराज हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्याचबरोबर मेजर हा एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गेल्या दोन वर्षांपासून रेंगाळलेल्या पृथ्वीराजच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला. त्याला प्रेक्षकांचा म्हणावा असा प्रतिसाद मिळालेला नाही. भलेही अक्षयच्या इतर चित्रपटांप्रमाणे या चित्रपटालाही वादाचा सामना करावा लागला असला तरीही त्याला यश मिळालेले नाही. संजय दत्त, मानुषी छिल्लर याशिवाय इतर मोठी स्टारकास्ट या चित्रपटामध्ये आहे. अक्षयनं गेल्या काही दिवसांपासून आपल्या या चित्रपटाचे मोठ्या प्रमाणात प्रमोशनही केले होते. मात्र विक्रमच्या झंझावातापुढे सम्राट पृथ्वीराजचा काही निभाव लागलेला नाही.

Vikram Kamal Haasan Movie
Bollywood VS South: कमाईतही टॉलीवूड दिग्दर्शक 'टॉपर', बॉलीवूड 'काठावर'

विक्रमच्या कमाईबाबत बोलायचे झाल्यास या चित्रपटानं तीन दिवसांत भारतातून शंभर कोटींची कमाई केली आहे. तर जगभरातून 150 कोटींचा गल्ला जमवला आहे. येत्या काही दिवसांत हा आकडा अजुन वाढणार असल्याची शक्यता आहे. तुलनेनं पृथ्वीराजला मिळालेलं ओपनिंग फारसं वाईटही नाही. मात्र विक्रमच्या कमाईच्या आकड्यांसमोर ते ओपनिंग कमी आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या प्रतिसादावर अक्षयच्या पृथ्वीराजचे यश अवलंबून आहे. असं म्हटलं जातं की, कमल हासन, विजय सेतूपति च्या विक्रमचं प्रमोशन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात झालं होतं. त्याच्या ट्रेलरला युट्युबवर एका दिवसांत कोट्यवधी व्ह्युज होते. त्यावरुन त्याची क्रेझ लक्षात येईल

Vikram Kamal Haasan Movie
IIFA Viral: बच्चन परिवाराचा डान्स चर्चेत, नेटकऱ्यांकडून वाहवा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com