Salman Khan: "सलमान डुकरासारखं खातो आणि कुत्र्यासारखा व्यायाम करतो"; भाईजानबद्दल विंदू दारा सिंग बोलला!

नुकत्याच एका मुलाखतीमध्ये विंदू दारा सिंगनं (Vindu Dara Singh) सलमाननं गरजू लोकांना केलेल्या आर्थिक मदतीबद्दल सांगितलं. तसेच त्यानं सलमानच्या फिटनेसबद्दल देखील सांगितलं.
Salman Khan and Vindu Dara Singh
Salman Khan and Vindu Dara Singhesakal

Salman Khan: बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) हा त्याच्या चित्रपटांमुळे आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो सलमान हा त्याच्या मित्रांच्या मदतीला धावून जात असतो. तसेच तो गरजू लोकांची मदत देखील करतो. सलमानची बिंग ह्युमन ही संस्था गरजू लोकांची मदत करत असते. सलमानच्या अनेक मित्रांनी त्याच्या दयाळूपणाबद्दल अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये विंदू दारा सिंगनं (Vindu Dara Singh) सलमाननं गरजू लोकांना केलेल्या आर्थिक मदतीबद्दल सांगितलं. तसेच त्यानं सलमानच्या फिटनेसबद्दल देखील सांगितलं.

विंदू दारा सिंग म्हणतो, "सलमान डुकरासारखं खातो"

सलमान हा त्याच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देत असतो. तो वर्क-आऊट करतानाचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर शेअर करतो. अशताच आता सलमानच्या फिटनेसबद्दल विंदू दारा सिंगनं मुलाखतीत सांगितलं आहे. सिद्धार्थ कन्ननच्या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये विंदू दारा सिंग म्हणाला,"सलमान माझा लहानपणीचा मित्र आहे. तो मला म्हणायचा की, तुझे शरीर पाहूनच मी व्यायाम करायला सुरुवात केली. मी त्याला म्हणायचो, तू जरा जास्तच व्यायाम करतोस. सलमान हा डुकरासारखं खातो आणि कुत्र्यासारखा व्यायाम करतो. पण तो खूपच चांगला माणूस आहे. तो लोकांना मदत देखील करतो."

विंदू दारा सिंग मुलाखतीत सांगितलं की, सलमाननं अनेकांना आर्थिक मदत केली आहे. तो मुलाखतीमध्ये म्हणाला, "सलमानचे वडील सलीम खान हे रोज सलमानचा मित्र नदीमकडे पैसे देत होते. ते पैसे सलमानला खर्च करण्यासाठी दिले जायचे. पण सलमान त्या पैशातील राहिलेले पैसे गरिबांना द्यायचा. मी आणि सलमान जेव्हा शूटिंग करायचो तेव्हा सलमानला भेटायला बरेच लोक यायचे. ते लोक सलमानकडे मदत मगायचे. तेव्हा नदीम आणि शेरा हे दोघे या लोकांमधील जे खरंच गरजू लोक आहेत, त्यांना सलमानकडे घेऊन जायचे. मग सलमान त्या लोकांना पैसे देत होता. सलमान खूप लोकांना मदत करायचा."

Salman Khan and Vindu Dara Singh
Salman Khan: शब्द पाळला! कॅन्सरग्रस्त जगनबीरला भाईजाननं दिलं सरप्राईज, व्हिडीओ व्हायरल

विंदू दारा सिंगनं 'या' चित्रपटात केलं काम

विंदू दारा सिंगनं अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे.1994 मध्ये रिलीज झालेल्या करण या चित्रपटातून त्यानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. रब दियान रखा या पंजाबी चित्रपटात देखील त्यानं काम केलं आहे. त्यानं जय वीर हनुमान या टीव्ही मालिकेत हनुमानाची भूमिका साकारली. हाऊसफुल 2, मुझे शादी करोगी,कमबख्त इश्क या चित्रपटांमध्ये त्यानं भूमिका साकारल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com