'त्वाडा कुत्ता टॉमी, साडा कुत्ता कुत्ता'ला रोनित अश्राने दिला नवीन तडका, हसून व्हाल लोटपोट

दिपाली राणे-म्हात्रे
Tuesday, 15 December 2020

बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडे आणि सारा अली खानच्या हावभावांची नकल केल्यानंतर आता रोनित अश्राने पंजाबची कतरिना कैफ म्हणजे शेहनाज गिलची नक्कल केली आहे.

मुंबई- प्रसिद्ध युट्युबर आणि संगीत निर्माता यशराज मुखातेने काही दिवसांपूर्वीच 'बिग बॉस १३'ची स्पर्धक राहिलेल्या शेहनाज गिलवर केलेला व्हिडिओ तुम्ही पाहिला असेलंच. या व्हिडिओने काही तासांतच लाखो व्ह्युजचा टप्पा पार केला होता. यशराजने शेहनाजच्या 'त्वाडा कुत्ता टॉमी, साडा कुत्ता कुत्ता' या डायलॉगवर एक मजेशीर म्युझिकल व्हिडिओ बनवला होता. हा व्हिडिओ पुन्हा एकदा राशीच्या व्हिडिओ सारखा सुपरहिट झाला. याच व्हिडिओला आता टिकटॉक स्टार रोनित अश्राने नवीन तडका दिला आहे. रोनितचा हा नवीन तडका देखील चांगलाच व्हायरल होतोय.  

हे ही वाचा: रेमो डिसूजाची कशी आहे तब्येत? पत्नी लिजेलने व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना दिले अपडेट  

बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडे आणि सारा अली खानच्या हावभावांची नकल केल्यानंतर आता रोनित अश्राने पंजाबची कतरिना कैफ म्हणजे शेहनाज गिलची नक्कल केली आहे. शेहनाज गिल 'बिग बॉस १३'च्या घरात एक डायलॉग बोलली होती. क्या करु मे मर जाऊ? मेरी कोई फिलींग नही है? तुम्हारी फिलींग तुम्हारी, त्वाडा कुत्ता टॉमी, साडा कुत्ता कुत्ता? यशराज मुखातेने याच डायलॉगला एका मजेशीर स्वरुपात सादर केलं होतं. आता याच म्युझिकल डायलॉगवर टिकटॉक स्टार रोनित अश्राने त्याच्या हटके हावभावांनी लोकांच मन जिंकलं आहे. 

रोनित अश्राने त्याच्या व्हिडिओमध्ये शेहनाज गिलच्या बिग बॉसच्या प्रवासातील वेगवेगळ्या रुपातील नक्कल केली आहे. हा व्हिडिओ त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्यावे लिहिलंय, 'त्वाडा कुत्ता टॉमी, साडा कुत्ता कुत्ता'  (मी यामध्ये केवळ शेहनाज गिलसोबत बिग बॉसचा पूर्ण सिझन पाहू शकतो.) या व्हिडिओमध्ये त्याने यशराज मुखातेला देखील टॅग केलं आहे. या व्हिडिओवर अनेक युजर्स त्यांनी मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. 

रोनित अश्राने याआधी तारक मेहता का उल्टा चश्मामधील कलाकार जेठालाल, दयाबेन आणि बबीताजी यांची नक्कल केली होती. सोशल मिडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता.   

viral social ronit ashra new video on tuada kutta tommy sadda kutta kutta  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: viral social ronit ashra new video on tuada kutta tommy sadda kutta kutta