पोलिसानं डिलिव्हरी बॉयच्या कानशीलात लगावली, नोकरी गमावली!

Video Viral: पोलिसानं रागाच्या भरात एका डिलिव्हरी बॉयच्या कानशीलात लगावली.
Viral Video Policeman slap food delivery boy police corp
Viral Video Policeman slap food delivery boy police corp esakal

Video Viral: पोलिसानं रागाच्या भरात एका डिलिव्हरी बॉयच्या कानशीलात लगावली. तो व्हिडिओ जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हा मात्र त्या पोलिसाची (Viral video) पाचावर धारण बसली. आपण रागाच्या भरात काय करुन बसलो असे त्याला वाटले. मात्र तोपर्यत बराच उशीर झाला होता. त्या पोलिसाला अखेर त्याची (Social Media News) नोकगी गमावावी लागली. सध्या सोशल मीडीयावर तो व्हिडिओ व्हायरल झाला असून त्याला नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या कमेंट्सही दिल्या आहेत. पण त्या डिलिव्हरी बॉयच्या कानशीलात मारण्याचे असे नेमके काय कारण (Delivery Boy) होते हे आपण जाणून घेणार आहोत. सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होताना दिसतात. काही वेळेला अशा गंमतीदार गोष्टी या माध्यमातून समोर येतात की, त्यातून जे ऐकतो त्यावर विश्वास ठेवणे कठीण होऊन बसते.

गेल्या काही वर्षात सोशल मीडियाचा वाढलेला वापर, त्याचा प्रभाव, त्याची परिणामकारता यामुळे सोशल मीडियावर व्हायरल झालेली एखादी गोष्ट वाऱ्याच्या वेगानं सगळीकडे पसरते. काही सेकंदाच्या अवकाशात जगाच्या हव्या त्या (Social media Viral News) कोपऱ्यात पोहचणारी ती गोष्ट यामुळे त्याचा होणारा परिणामही मोठाच आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक चुकीच्या गोष्टीही समोर आल्या आहे. त्यातून अनेकांना शिक्षाही मिळाल्या आहेत. कित्येक चुकीच्या गोष्टींना आळा घालण्याचे काम सोशल मीडियाच्या माध्यमातून झाले आहे. (Viral Video) लोकांचे प्रबोधन करण्याचे काम बऱ्याच अंशी सोशल मीडीयानं केले आहे. त्याचेच एक उदाहरण एका व्हिडिओच्या माध्यमातून दिसून आले आहे.

Viral Video Policeman slap food delivery boy police corp
बॉडीगार्डशिवाय छोट्या कारमध्ये रतन टाटा; दिग्गज उद्योगपतीच्या साधेपणाचा Video Viral

त्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, एका पोलीस कर्मचाऱ्यानं एका डिलिव्हरी बॉयच्या कानशीलात लगावली. तो व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ तामिळनाडूतील कोईंम्बतुरमधला आहे. ड्युटीवर असणाऱ्या एका वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यानं फु़ड डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीला कानशीलात लगावली. वाहतुकीच्या नियमांवरुन त्यांच्यात झालेल्या बाचाबाचीनं पोलिसाला राग अनावर झाला अन त्यानं थेट त्या मुलालाच मारहाण केली. तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

Viral Video Policeman slap food delivery boy police corp
KK च्या मृत्यूनंतर पत्नी कृष्णाच्या 'त्या' पेंटिंगची चर्चा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com