Virat Kohli होणार किशोर कुमार यांचा भाडेकरु! सुरु करतोय प्लॅन B...

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली हा आता वेगळ्या कारणासाठी चर्चेत आला आहे. क्रिकेटसोबतच विराट आता बिझनेस क्षेत्रामध्ये पदार्पण करणार असल्याचे दिसून आले आहे.
 Virat Kohli  News
Virat Kohli News esakal

Virat Kohli News: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली हा आता वेगळ्या कारणासाठी चर्चेत आला आहे. क्रिकेटसोबतच विराट आता बिझनेस क्षेत्रामध्ये पदार्पण करणार असल्याचे दिसून आले आहे. तो बॉलीवूडचे प्रसिद्ध (viral News) गायक किशोर कुमार यांचा भाडेकरु होणार आहे. त्याला आपला नवा बिझनेस सुरु करण्यासाठी किशोर कुमार यांचा बंगला आवडला असून (social media viral news) त्याठिकाणी तो एक मोठा प्रोजेक्ट सुरु करण्याचा विचार त्याने केला आहे. जुहू येथील किशोर कुमार यांचा बंगला विराटला आवडल्याची माहिती (kishore kumar) किशोर कुमार यांचे चिरंजीव अमित कुमार यांनी दिली आहे. यापूर्वी विराटच्या नव्या प्रोजेक्टची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. कोहली आता बिझनेसमध्ये आपलं नशीब आजमावणार असल्याचे ऐकताच चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.

गेल्या काही दिवसांपासून खराब फॉर्ममध्ये असणारा विराटला कॅप्टन्सी सोडावी लागली. त्यावरुन वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. त्याचा परिणाम त्याच्या कॅप्टन्सीवर देखील झाला होता. आता विराट एशिया कपमध्ये आपला जलवा दाखवतो आहे. त्यानं काल हाँगकाँगच्या विरोधात चमकदार कामगिरी केली आहे. मात्र अजुनही बलाढ्य संघाविरोधात त्यानं चांगली बॅटिंग करावी अशी अपेक्षा चाहत्यांची आहे. यासगळ्यात विराटच्या डोक्यात बिझनेसची आयडिया आली आहे. त्यामुळे त्यानं प्लॅन बी रेडी केला आहे. तो आता किशोर कुमार यांचा भाडेकरु झाला आहे. त्याठिकाणी तो रेस्टॉरंट सुरु करण्याचा विचार करत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विराटचा असा प्लॅन असल्याची चर्चा होती. आता तो प्रत्यक्षात येणार आहे. किशोर कुमार यांच्या बंगल्याच्या आवारात मोठं काम सुरु असल्याचे सांगितले जात आहे.

 Virat Kohli  News
मनावर नियंत्रण मिळवणारी बाप्पाची ७ शस्त्रे
 Virat Kohli  News
'माझं मन इतकं चंचल की...', प्राजक्ताचं गणेशाला साकडं

विराट त्या बंगल्याच्या आवारात रेस्टॉरंट सुरु करणार आहे. कदाचित पुढील महिन्यापासून तो ते सुरु करेल असे सांगितले जात आहे. यासाठी विराटनं गेल्या वर्षांपासून प्लॅनिंग सुरु केले होते अशी चर्चा आहे. याविषयी किशोर कुमार यांचे चिरंजीव अमित कुमार यांनी सांगितले की, जेव्हा लीना चंदावरकर यांचा मुलगा सुमीत यांची विराटशी काही दिवसांपूर्वी भेट झाली तेव्हा त्यांच्यात चर्चा झाली होती. आम्ही विराटला पाच वर्षांच्या करारानं बंगल्याची जागा भाड़्यानं दिली आहे.

असा प्लॅन बी तयार असणं हे काही विराटसाठी नवीन नाही. त्यानं यापूर्वी असे प्रयोग केले आहेत. त्याचे आणखी एक रेस्टॉरंट आहे. 2017 मध्ये त्यानं आर के पुरममध्ये हॉटेल सुरु केले होते. याशिवाय विराटची स्वताची एक कपड्याची कंपनी देखील आहे. त्याचे नाव राँग असे आहे.

 Virat Kohli  News
ऋषिपंचमीच्या व्रतामागचं 'लॉजिक' नेमकं आहे तरी काय?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com