विशाल भारव्दाजचा आगामी चित्रपट अगाथा ख्रिस्तीवर आधारित

 Vishal Bhardwaj to develop film franchise based on the works of Agatha Christie
Vishal Bhardwaj to develop film franchise based on the works of Agatha Christie

मुंबई - नेहमीच्या वाटेवरुन न जाता स्वतचा वेगळा मार्ग काढणा-या विशाल भारव्दाजची बॉलीवूडमध्ये ओळख हटके आहे. चाकोरी मोडून काही प्रयोग व सर्जनशील करण्याचा ध्य़ास घेतलेल्या विशाल भारव्दाजची पुढील काळातील चित्रनिर्मिती ही रहस्यकथा सम्राज्ञी अगाथा ख्रिस्तीच्या कामावर आधारित असणार आहे. सहा दशकांहून अधिक काळ लोटल्यानंतरही अगाथाच्या नावाचा करिष्मा काही कमी झालेला नाही.

आजही जगभरात अगाथा ख्रिस्तीचे साहित्य वाचणा-यांची संख्या लक्षणीय आहे. कित्येक मान्यवर रहस्यकथाकारांची प्रेरणास्थान अगाथा ख्रिस्ती राहिली आहे. त्यामुळे अशा विलक्षण व्यक्तिमत्वाचा अनेकांवर पडलेला दिसून येतो. विशालने देखील तिच्या साहित्यावर व व्यक्तिमत्वावर आधारित चित्रपट निर्मिती करण्याचा विचार केला आहे. अगाथावर आधारित त्याच्या पहिल्या चित्रपटाच्या चित्रिकरणाला 2021 पासून सुरुवात होणार आहे. यापूर्वी विशालने जगप्रसिध्द नाटककार विल्यम शेक्सपियरच्या काही नाटकांवर आधारित चित्रपटाची निर्मिती केली होती. यात त्याने मॅक्बेथवर मकबूल, ऑथेल्लोवर ओंकारा आणि हॅम्लेटवर हैदरसारखे आशयघन चित्रपट तयार केले आहेत.

 विशालच्या त्या चित्रपटांना जाणकार चित्रपट अभ्यासक, समीक्षक, जाणकार यांच्याकडून पोचपावती मिळाली होती. जगभर त्याचे कौतूकही झाले होते. अगाथाच्या आयुष्यावर आधारित असलेल्या पहिल्य़ा चित्रपटात एक अभिनेत्री आपल्या सहका-याच्या खूनाचा शोध घ्यायचा प्रयत्न करतेय. असे दाखविण्यात आले आहे. 2021 पासून या चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरुवात होणार आहे. अशी माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे. चित्रपटांत कोण काम करणार याविषयी अद्याप काय ठरले नसून त्याची माहिती थोड्याच दिवसांत समोर येणार आहे. 

आपल्या नविन प्रोजेक्टविषयी सांगताना विशालने सांगितले, आपल्या कथेत वाचकांना गुंगवून ठेवण्याचे विलक्षण कसब अगाथा ख्रिस्तीकडे होते. त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न या चित्रपटाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. तिच्यावर आधारित चित्रपट निर्मिती करणे हा एक वेगळ्या प्रकारचा अनुभव असणार आहे. या कामात अगाथा ख्रिस्ती लिमिटेड कंपनी पार्टनर यांच्याकडून सहकार्य मिळाल्याची माहिती विशालने एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीतून पुढे आली आहे. 

 
 
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com