esakal | 'देशातील इतर प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यासाठी आर्यनचा वापर'
sakal

बोलून बातमी शोधा

Vishal Dadlani

'देशातील इतर प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यासाठी आर्यनचा वापर'

sakal_logo
By
युगंधर ताजणे

अंमली पदार्थ विरोधी पथकानं (एनसीबी) मुंबईत मोठी कारवाई केली आहे. मुंबईच्या समुद्रात क्रूझवर सुरु असलेल्या एका रेव्ह पार्टीवर धाड टाकत एनसीबीने आठ जणांना ताब्यात घेतलं होत यावेळी क्रूझवर बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानदेखील उपस्थित होता.म्हणूनच काही दिवसांपुर्वी आर्यन खानला याला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली आहे. दरम्यान, अनेक कलाकार त्याच्या समर्थनासाठी पुढे येत आहेत. तसेच काही कलाकार शाहरुख च्या पाठिशी खंबीर उभे आहे.तर आता संगीतकार विशाल दादलानीने ट्विटर वरून शाहरुखचे समर्थन केले आहे.

विशालने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट केलं. “शाहरुख आणि त्याच्या कुटुंबाचा वापर लोकांचे लक्ष बाकीच्या गोष्टीवरून वेधण्यासाठी केला जात आहे, अदानी बंदरातील असलेले ३ हजार किलो तालिबानी-ड्रग तसेच भाजप आमदाराच्या मुलाने केलेल्या शेतकऱ्यांची हत्या या मुद्यांकडे दुर्लक्ष करण्यासाठी त्याच्यावर निशाणा साधला आहे,”, असे विशालने सांगितले. विशालचे हे ट्वीट एका निर्मात्याने केलेल्या ट्वीटला रिट्वीट करत दिले आहे. “गेल्या ३० वर्षात #SRK सोबत काम करणारे किती निर्माते, दिग्दर्शक आज त्याच्यासोबत एकजूटीने उभे आहेत?”, असे त्या ट्वीटमध्ये प्रश्न विचारला होता. विशालने केलेले हे ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे.

आता,आर्यन खानची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये करण्यात आली आहे. त्याच्यासोबत इतर पाच आरोपींना आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात आले. येत्या पाच दिवस आर्यनचा मुक्काम आर्थर रोड जेलमध्ये असणार आहे. यावेळी जेलमध्ये आर्यन खानला कोणतीही खास ट्रीटमेंट दिली जाणार नाही. तसेच न्यायालयाच्या आदेशापर्यंत त्याला बाहेरचे जेवण मिळणार नाही.त्याला फक्त तुरुंगातील जेवण दिले जाणार आहे.

हेही वाचा: आर्यन खानचा मुक्काम बुधवारपर्यंत न्यायालयीन कोठडीतच!

हेही वाचा: Mumbai : आर्यन खान प्रकरणातील साक्षीदार किरण गोसावी अडचणीत

loading image
go to top