
विश्व हिंदू परिषदेच्या (Vishwa Hindu Parishad VHP) गुजरात युनिटनं मंगळवारी शाहरुख खान स्टारर 'पठाण' चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या एक दिवस आधी विरोध मागं घेतला.
Pathan Movie : यापुढं आम्ही शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटाला विरोध करणार नाही; विश्व हिंदू परिषदेचा मोठा निर्णय
नवी दिल्ली : बॉलीवूड स्टार शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'पठाण' चित्रपटाला (Pathan Movie) विरोध करणार नसल्याचं विश्व हिंदू परिषदेनं जाहीर केलं आहे.
सेन्सॉर बोर्डाच्या (Censor Board) सूचनेनुसार, गाण्याचे वादग्रस्त बोल आणि दृश्ये काढून टाकल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. गुजरात सरकारनं यापूर्वी चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान मल्टिप्लेक्सच्या सुरक्षेचं आश्वासन दिलं होतं.
यावर विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते श्रीराज नायर म्हणाले, 'सध्या तरी विहिंप पठाण चित्रपटाला विरोध करणार नाही. आमचे पूर्वीचे आक्षेप लक्षात घेऊन चित्रपटात केलेले बदल योग्य आहेत. चित्रपट पाहिल्यानंतर आम्हाला काही आक्षेपार्ह आढळल्यास आम्ही चित्रपटाचा निषेध करू.
हेही वाचा: Shri Ram Sene : सत्तेतल्या भाजपला बसणार दणका; श्रीराम सेनेचे प्रमुख अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूक लढवणार
विश्व हिंदू परिषदेच्या (Vishwa Hindu Parishad VHP) गुजरात युनिटनं मंगळवारी शाहरुख खान स्टारर 'पठाण' चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या एक दिवस आधी विरोध मागं घेतला आणि चित्रपटातून 'आक्षेपार्ह' सामग्री काढून टाकल्याबद्दल समाधान व्यक्त केलं.
हेही वाचा: Ramdas Athawale : आठवलेंची नाराजी उघड; शिंदे-फडणवीस सरकारविरोधात पहिल्यांदाच केलं भाष्य, काय म्हणाले मंत्री?
विहिंपच्या गुजरात युनिटचे सचिव अशोक रावल यांनी एका निवेदनात म्हटलंय, सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशननं (CBFC) चित्रपटातील "अश्लील गाणी" आणि "अश्लील शब्द" सुधारित केले आहेत, त्यामुळं उजव्या विचारसरणीचे गट यापुढं याला विरोध करणार नाहीत. दरम्यान, शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांचा 'पठाण' चित्रपट आज, 25 जानेवारीला बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आहे.