Vivek Agnihotri : 'माझे अन् बाकीच्या प्रवाशांचे पैसे परत द्या', विवेक अग्निहोत्रींचा इंडिगो एअरलाईनवर भडका, नेमकं घडलं काय?

'द काश्मीर फाईल्स' आणि 'द व्हॅक्सीन वॉर' सारख्या चित्रपटांमधून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या विवेक अग्निहोत्री यांच्या नावाचा दरारा काही वेगळाच आहे.
 Vivek Agnihotri Bollywood Director Trolled Indigo
Vivek Agnihotri Bollywood Director Trolled Indigoesakal

Vivek Agnihotri Bollywood Director Trolled Indigo : 'द काश्मीर फाईल्स' आणि 'द व्हॅक्सीन वॉर' सारख्या चित्रपटांमधून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या विवेक अग्निहोत्री यांच्या नावाचा दरारा काही वेगळाच आहे. परखडपणा आणि स्पष्टपणानं आपले विचार मांडणाऱ्या कलाकारांमध्ये त्यांचे नाव घ्यावे लागेल. ते गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आले आहे. सोशल मीडियावर त्यांनी अनेक सेलिब्रेटींना खडेबोल सुनावले आहे.

आपल्याला जे योग्य वाटते ते ठामपणे मांडत वेगळ्या प्रकारे विचारांना व्यक्त करणाऱ्या कलाकारांमध्ये त्यांचे नाव घ्यावे लागेल. त्यांच्या द काश्मीर फाईल्स या चित्रपटावरुन जो वाद झाला तेवढा वाद बॉलीवूडच्या कोणत्याची चित्रपटाच्याबाबत झाला नसेल असे म्हटले जाते. तरी देखील या चित्रपटानं तीनशे कोटींपेक्षा अधिक कमाई करुन वेगळा विक्रम आपल्या नावावर केला होता.

Life Balance जाणून घ्या हा 'वेक अप काॅल' आणि बना सर्वार्थाने समृद्ध

यानंतर अग्निहोत्री यांच्या द व्हॅक्सीन वॉरनं देखील प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. मात्र त्याला म्हणावा असा प्रतिसाद मिळाला नाही. नाना पाटेकर, गिरीजा ओक, पल्लवी जोशी या कलाकारांच्या त्यात प्रमुख भूमिका होत्या. आता अग्निहोत्री हे त्यांच्या एक्सवरील एका पोस्टमुळे चर्चेत आले आहेत त्यांनी एका एअर लाईन्स कंपनीवर नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर ती पोस्ट नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियेचा विषय आहे.

अग्निहोत्री हे इंडिगो एअरलाईननं प्रवास करणार होते. मात्र ती फ्लाईट दीड तास उशिरानं निघणार होती. त्यामुळे अग्निहोत्री हे त्रस्त झाले. एवढेच नाहीतर त्या फ्लाईटमधील शौचालय अस्वच्छ होते. त्यामुळे अग्निहोत्री आणखी भडकले. त्या फ्लाईटची अशी अवस्था पाहिल्यावर अग्निहोत्री यांनी सोशल मीडियावर त्याविषयी पोस्ट लिहिली आणि ती व्हायरल झाली.

 Vivek Agnihotri Bollywood Director Trolled Indigo
Ranbir Kapoor Trolled : राजामौलींच्या पाया पडला ट्रोल झाला, काय आहे कारण? नेटकऱ्यांनी काढला जाळ

अग्निहोत्री यांनी पोस्ट शेयर करत एअर लाईन इंडिगोवर टीका केली आहे. कोणत्या प्रकारची सुविधा नाही. अस्वच्छता यामुळे आपण हैराण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. आपण सकाळी सव्वा अकरा वाजता फ्लाईटमध्ये बसलो. मात्र पावणे एक झाला तरी फ्लाईटनं टेक ऑफ केलं नाही. त्यामुळे अग्निहोत्री यांनी मला आणि बाकीच्या सर्व प्रवाशांना त्यांचे पैसे परत मिळावे. अशी मागणी केली आहे.

 Vivek Agnihotri Bollywood Director Trolled Indigo
Ranbir kapoor Animals : ८०० मास्क ४०० कोयते 'अ‍ॅनिमल' मधील तो फाईट सीन कसा शुट झाला माहितीये?

मी सकाळी सव्वा अकरा वाजता विमानात बसलो आहे. आता १२.४० झाले आहेत. आणि दीडतास कॅप्टन म्हणा किंवा चालक कुणाकडूनही कोणत्याच प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही. मला माहिती आहे की, जगभरात अनेक ठिकाणी फ्लाईटला उशीर होतो. पण अशा प्रकारची गैरकारभार पाहण्यात नाही. आपल्या प्रवाशांच्याबाबत एवढा निष्काळजीपणा कधी पाहिला नाही. असे अग्निहोत्री यांनी म्हटले आहे.

या सगळ्यात इंडिगोनं देखील सदर तक्रारीची नोंद घेतली असून अग्निहोत्री यांच्या त्या पोस्टवर उत्तर दिले आहे. त्यांनी उशीर झाल्याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त केली आहे. यापुढील काळात अशा प्रकारच्या कोणत्याही परिस्थितीला आपल्याला सामोरं जावं लागणार नाही याची काळजी आम्ही घेऊ असे इंडिगोच्यावतीनं सांगण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com