Covid 19 वर सिनेमा बनवत आहेत विवेक अग्निहोत्री, 'या' महत्त्वाच्या घटनेभोवती फिरणार कथा

विवेक अग्निहोत्री यांनी आपल्या नवीन सिनेमाचं पोस्टर शेअर करत चाहत्यांनाच सिनेमाचं नाव सुचवा असं सांगितलं आहे.
Vivek Agnihotri Next film on covid-19,shared a poster
Vivek Agnihotri Next film on covid-19,shared a posterGoogle

Vivek Agnihotri: 'द काश्मिर फाईल्स'च्या यशानंतर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींच्या आगामी सिनेमाच्या प्रतिक्षेत आता चाहते आहेत. द काश्मिर फाईल्स या वर्षातील हिट सिनेमांपैकी एक आहे. छोट्या बजेटच्या या सिनेमानं केलेली कमाई पाहून सगळेच हैराण झाले होते. विवेक सोशल मीडियावर भलतेच सक्रिय पहायला मिळतात. आपल्या येणाऱ्या सिनेमांविषयी ते नेहमी हिंट देताना दिसतात. आता विवेक अग्निहोत्री यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात सिनेमाचं नाव स्वतः सांगितलं नाही,तर आपल्या चाहत्यांनाच सिनेमाचे नाव काय ठेवावे याविषयी विचारणा केली आहे. ( Vivek Agnihotri Next film on covid-19,shared a poster)

Vivek Agnihotri Next film on covid-19,shared a poster
Alia Bhatt: आलियाच्या मुलीला पाहून महेश भट्टना आठवली पूजा भट्ट; म्हणाले...

विवेक अग्निहोत्री यांनी जी पोस्ट शेअर केली आहे,त्यावर लिहिलं आहे की,'' 'THE(...)WAR''हे नाव त्या पोस्टमध्ये शेअर केलेल्या पोस्टवर लिहिलं आहे. त्यांनी नावात जी मोकळी जागा सोडली आहे त्याविषयी लोकांना विचारणा केली आहे की, ''रिकामी जागा भरा...'',त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे,''तुम्ही माझ्या आगामी सिनेमाच्या टायटलचा अंदाज लावू शकता का?''

Vivek Agnihotri Next film on covid-19,shared a poster
Alia- Ranbir च्या मुलीसंदर्भात पाकिस्तानातून केली गेली पोस्ट; शुभेच्छा नाहीत तर थेट...

विवेक अग्निहोत्री यांची पोस्ट पाहून नेटकरी मात्र खूश झाले आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले आहे की-'वॅक्सिन'. तर दुसऱ्यानं लिहिलं आहे- 'द कोव्हिड वॉर'. आणखी एकानं लिहिलं आहे, 'वॅक्सिन किंवा त्याच्याशी संबंधित एखादं नाव असावं, कारण माझं ठाम मत आहे की तुम्ही कोरोना वॅक्सिनच्या आविष्कारावर आधारित सिनेमा बनवत आहात..जो एक वेगळा इतिहास रचेल'.

Vivek Agnihotri Next film on covid-19,shared a poster
Tabbu: तब्बूच्या पजामा पार्टीची सोशल मीडियावर चर्चा, फराह-शिल्पानं फोटो शेअर करत उडवून दिली धमाल

बोललं जात आहे की विवेक अग्निहोत्री आपल्या या सिनेमाचं शूटिंग लखनौमध्ये करणार आहेत. ते यासंदर्भात एका न्यूज पोर्टलशी बातचीत करताना म्हणाले,''मी यूपी,कानपूरहून आलोय.मी ज्या पद्धतीचे सिनेमे बनवतो,ते माझ्या मूळ राज्यात मी शूट करू शकत नाही. पण माझ्या आगामी सिनेमाचं कथानक असं आहे आहे की ते मात्र मी तिथे शूट करू शकतो. विवेक काही दिवसांपूर्वीच लखनौला गेले होते. जिथे त्यांनी त्यांच्या राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. सिनेमाचं शूटिंग १० डिसेंबरला सुरू होईल आणि ते ४० दिवसांचे शेड्युल असणार आहे''.

विवेक पुढे म्हणाले,''द काश्मिर फाईल्स मधून आम्ही जे काही कमावलं आहे,त्यातून आम्ही एक असा सिनेमा बनवण्याचा विचार केला ज्याचा आम्हाला गर्व असेल. मी कोवॅक्सिन संदर्भातलं एक महत्त्वाचं पुस्तक वाचलं आहे. ज्यामध्ये सांगितलं गेलं आहे की,कसं भारतीय शास्त्रज्ञांनी कोव्हिड वॅक्सिन बनवण्यासाठी मेहनत घेतली. लोकांना यासंदर्भात काही माहिती नाहीय तेव्हा या प्रेरणादायी कथेला लोकांपर्यंत पोहोचवावं असं आम्हाला वाटलं. संपूर्ण सिनेमा लखनौ मध्ये शूट केला जाईल''.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com