'तिथे कॅनडात बसून एक माणूस...,हे कसं शक्य?'; अग्निहोत्री पुन्हा भडकले

कॅनडीयन दिग्दर्शक डायलनने काही दिवसांपूर्वी द काश्मिर फाईल्स सिनेमाला ' हिंसा पसरवणारा कचरा' असं म्हटलं होतं.
Vivek Agnihotri react on canadian director dylan mohan gray, gray says. the kashmir file is a garbage
Vivek Agnihotri react on canadian director dylan mohan gray, gray says. the kashmir file is a garbageGoogle

The Kashmir Files: द काश्मिर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री(Vivek Agnihotri) गेल्या काही दिवसांत एकापाठोपाठ एक अशा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे बरेच चर्चेत आहेत. प्रत्येक वेळी ते बॉलीवूडवर नाहीतर तिथे काम करणाऱ्या दिग्दर्शकांवर निशाणा साधताना दिसत आहेत. त्यांनी बॉलीवूडच्या कलाकारांवर आणि तिथल्या काही ग्रुप्सवर 'द काश्मिर फाईल्स' विरोधात अभियान चालवल्याचा आरोपही केला आहे. यावेळी विवेक अग्निहोत्री यांनी कॅनडाच्या दिग्दर्शकावर हल्लाबोल केला आहे. काही दिवसांपूर्वीच कॅनडाच्या दिग्दर्शकानं द काश्मिर फाईल्सला 'हिंसा पसरवणारा कचरा' असं संबोधलं गेलं होतं. एवढंच नाही तर त्याने भारताची प्रतिमा डागाळणारा सिनेमा देखीस म्हटलं होतं. याच गोष्टीला ऐकून आता अग्निहोत्री भडकले आहेत.(Vivek Agnihotri react on canadian director dylan mohan gray, gray says. the kashmir file is a garbage)

Vivek Agnihotri react on canadian director dylan mohan gray, gray says. the kashmir file is a garbage
२४ ऑगस्ट,१९९३...माइकल जॅक्सनच्या आयुष्यातील 'काळा दिवस', वाचा इनसाइड स्टोरी

कॅनडाचे दिग्दर्शक डायलन ग्रे यांनी काही दिवस आधी द काश्मिर फाईल्सला लोकांच्या मनात हिंसा पसरवणारा कचरा म्हटलं होतं. त्यानं म्हटलं होतं की हा सिनेमा म्हणजे निव्वळ कचरा,याचा कलेशी काहीच संबंध नाही. मी अनुराग कश्यपशी सहमत आहे. भारताची प्रतिमा याने डागाळली जातेय. अनुराग कश्यपने देखील काही दिवस आधी आरआरआर सिनेमाला ऑस्करसाठी भारताकडून पाठवायला हवं असं म्हणत द काश्मिर फाईल्सला पाठवणार नाही अशी मला आशा आहे असं देखील म्हटलं होतं. जर आरआरआर ला पाठवलं तर अॅवॉर्ड जिंकण्याची संधी आहे,असं देखील अनुराग म्हणाला होता.

Vivek Agnihotri react on canadian director dylan mohan gray, gray says. the kashmir file is a garbage
KL Rahul-Athia Wedding:सुनील शेट्टीनं तोडली चु्प्पी;म्हणाला,'लग्न एका दिवसात..'

आता विवेक अग्निहोत्री यांनी एका मुलाखतीत म्हटलं आहे की, त्यांच्या विरोधात राजकारण केलं जात आहे,गटबाजीचं राजकारण खेळलं जात आहे. काही दिग्दर्शकांपेक्षा माझा राजकारणावरील अभ्यास दांडगा आहे. एवढं क्रेडिट मला मिळायलाच हवं. तिथे कॅनडात बसून एक माणूस माझ्यावर लक्ष ठेवून आहे ,हे कसं शक्य आहे? यामागे कोणती तरी गटबाजी होतेय हे निश्चित आहे.

Vivek Agnihotri react on canadian director dylan mohan gray, gray says. the kashmir file is a garbage
'३६ तासाच्या आत माझ्या बाळाला...', दिया मिर्झाचा हृदय पिळवटून टाकणारा अनुभव

अनुराग कश्यपच्या ऑस्करवरील वक्तव्यावर अग्निहोत्री म्हणाले होते,''द काश्मिर फाईल्स विरोधात उगाचच नकारात्मक प्रचार लोक करताना दिसत आहेत''. तसंच,बॉयकॉट विषयी देखील ते म्हणाले होते की,''लोकांमध्ये बॉलीवूडच्या घमेंडी स्वभावाला घेऊन राग आहे. आणि हेच कारण आहे की त्यांच्या सिनेमाला लोक ट्रोल करतायत,त्यांच्यावर बहिष्कार घालत आहेत''.

'RRR' की 'The Kashmir Files'; ऑस्करला कोण जाणार, काय म्हणतायत एक्सपर्ट्स?

काश्मिर फाईल्समध्ये अनुपम खेर, पल्लवी जोशी,मिथुन चक्रवर्ती,दर्शन कुमार,चिन्मय मांडलेकर असे कलाकार आहेत. सिनेमाला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. सुरुवातीला सिनेमानं धिम्या गतीनं सुरुवात केली पण मग थेट ३०० करोडपर्यंत मजल मारत बरेच रेकॉर्ड तोडले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com