Filmfare Award: सात नॉमिनेशन मिळूनही अग्निहोत्रींचा 'फिल्मफेअर'वर बहिष्कार.. ट्विट करत केली सडकून टीका..

विवेक अग्निहोत्री म्हणाले भ्रष्ट, अनैतिक आणि सिनेमाविरोधी पुरस्कार सोहळ्यामध्ये मी सहभागी होणार नाही.
Vivek Agnihotri refuses Filmfare Awards despite nods in 7 categories
Vivek Agnihotri refuses Filmfare Awards despite nods in 7 categoriessakal

Vivek Agnihotri On Film Fare Award: सध्या बॉलीवुडमध्ये चर्चा आहे ती 'फिल्मफेअर पुरस्कार 2023'ची (Filmfare Awards 2023). हा सोहळा आज रात्री पार पडणार आहे. बॉलीवूड मधील अत्यंत मनाचा असा हा पुरस्कार असून दिमाखदार सोहळ्यात तो दिला जातो.

पण हा पुरस्कार सोहळा पार पडण्यापूर्वीच त्याला गालबोट लागले आहे. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटाला ७ नामांकनं मिळाली आहेत. पण असे असतानाही विवेक अग्निहोत्री यांनी हा पुरस्कार नाकारला आहे. ट्विट करत विवेक अग्निहोत्री यांनी या पुरस्कारावर बहिष्कार टाकल्याचे म्हंटले आहे. सोबतच 'फिल्मफेयर' वर सडकून टीका देखील केली आहे.

(Vivek Agnihotri refuses Filmfare Awards despite nods in 7 categories)

Vivek Agnihotri refuses Filmfare Awards despite nods in 7 categories
Kiran Mane: फॅन्स तो सेलिब्रिटी के होते है.. मेरे तो.. किरण मानेची ती पोस्ट आणि चर्चेचा उधाण..

विवेक अग्निहोत्री हे फिल्मफेअर अवॉर्ड्स 2023  बॉयकॉट केलं आहेत. मी फिल्मफेअर  पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावणार नाही, असं स्पष्टपणे विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीट शेअर करुन सांगितलं आहे.

विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीटमध्ये एक फोटो शेअर केला. ज्यामध्ये 'द कश्मीर फाइल्स', 'गंगूबाई काठियावाड़ी', 'ब्रह्मास्त्र', 'भूल भुलैया 2', 'बधाई हो 2' , आणि  'ऊंचाई' या फिल्मफेअर अवॉर्ड्सचं नामांकन मिळालेल्या चित्रपटांचे पोस्टर्स आहेत. यासोबतच त्यांनी एक मजकूर लिहिला आहे.  ज्यामध्ये फिल्मफेअर वर सडकून टीका केली आहे.

विवेक अग्निहोत्री यांनी या ट्वीटमध्ये लिहिलं आहे की,  'मला मीडियाकडून समजलं की, द कश्मीर फाईल्स या चित्रपटाला 68 व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात 7 श्रेणींमध्ये नामांकन मिळालं आहे. पण मी नम्रपणे सांगतो की, या अनैतिक आणि सिनेमाविरोधी पुरस्कार सोहळ्यामध्ये मी  सहभागी होणार नाही.'

पुढे ते म्हणाले आहेत, 'फिल्मफेअरच्या मते, स्टार्सशिवाय इतर कोणीही महत्वाचे नाही. लोकप्रिय चेहऱ्यांशिवाय इतर लोकांचं कुणाला काही पडलेलं नाही. म्हणूनच, फिल्मफेअरच्या  अनैतिक जगात संजय भन्साळी किंवा सूरज बडजात्या सारख्या मास्टर डायरेक्टर्सना महत्व नाही.'

'संजय भन्साळीची ओळख आलिया भट्ट आहे, तर सूरज यांची ओळख  मिस्टर बच्चन आहेत.  फिल्मफेअर अवॉर्ड्सवरुनच चित्रपट निर्मात्यांची  प्रतिष्ठा ठरवली जाते, असे नाही पण ही अपमानास्पद व्यवस्था संपली पाहिजे. म्हणून, बॉलिवूडमधील भ्रष्ट, अनैतिक आणि गुंड प्रवृत्तीच्या विरोधात माझा निषेध आणि नाराजी व्यक्त करण्यासाठी मी असे पुरस्कार न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. '

' जे लेखक, दिग्दर्शक आणि चित्रपटाच्या क्रू सदस्यांना स्टार्सपेक्षा कमी वागणूक देतात,अशा कोणत्याही भ्रष्ट व्यवस्थेचा किंवा पुरस्कारांचा भाग होण्यास मी कायम नकार देतो. जे पुरस्कार जिंकले त्या सर्वांचे मी अभिनंदन करतो आणि जे पुरस्कार नाही जिंकले त्यांचे देखील अभिनंदन करतो.'अशी पोस्ट त्यांनी शेयर केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com