मोदींपेक्षा चांगला श्रोता मिळालाच नाही, विवेक अग्निहोत्रींनी केली प्रशंसा

'ज्यांच्यावर तुम्ही विश्वास करता, ते सर्व चांगले श्रोते असायला हवे.'
Narendra Modi And Vivek Agnihotri
Narendra Modi And Vivek Agnihotri esakal

'द काश्मीर फाईल्स' चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रशंसा केली आहे. ट्विटवर विवेक म्हणतात त्यांना आपल्या जीवनात नरेंद्र मोदींसारखा श्रोता मिळालाच नाही. यावर यूजर्संनी त्यांची फिरकी घेत प्रश्न विचारायला सुरुवात केली. विवेक अग्निहोत्री ट्विटरवर लिहितात, जेव्हा तुम्ही कोणाचे म्हणणे ऐकता आणि केवळ आपली मान हलवत असता, त्यावेळी ते बोलणाऱ्यात ऑक्सीटोसिन सोडते. ऑक्सीटोसिन एक तालमेल आणि विश्वास निर्माण करणारा न्युरोकेमिकल आहे. आपल्या चौहूबाजूंनी पाहा, ज्यांच्यावर तुम्ही विश्वास करता, ते सर्व चांगले श्रोते असायला हवे. ऐकणे कला नाही, विज्ञान आहे. #रचनात्मक चेतना. (Vivek Agnihotri Says I Did Not Get A Good Listener From Narendra Modi)

Narendra Modi And Vivek Agnihotri
देव-देवतांची फोटो शेअर करत प्रकाश राज म्हणाले,आपण कुठे चाललो आहोत?

पुढे अग्निहोत्री म्हणतात, मी आपल्या पूर्ण आयुष्यात ज्या महान श्रोत्याला भेटलो आहे ते आहेत नरेंद्र मोदी (Narendra Modi). तुम्ही सांगा तुमच्यासाठी कोण आहेत? यावर युजर्सने दिग्दर्शकाची फिरकी घेण्यास सुरुवात केली आहे. स्वप्निल नावाच्या यूजरने विचारले, आता कोणत्या चित्रपटाचे प्रमोशन करायचे आहे ? यावर उत्तर देताना विवेक म्हणाले, सायलन्ट फिल्म. दुसऱ्या एका यूजरने लिहिले, विवेकने आतापर्यंत जे काही म्हटले आहे, त्यावर कोणत्याही सर्वसामान्य माणसाला ऐकणे अवघड आहे. मी त्यासाठी मोदीजींचे कौतुक करतो. प्रमोद कुमार लिहिले, विवेक तुम्ही किती खोटे बोलत आहात. कधी टीव्ही, ट्विटर, रेडिओ, मन की बातमध्ये किंवा फेरी आणि बैठकीत.

Narendra Modi And Vivek Agnihotri
Pratap Pothen : प्रसिद्ध अभिनेता-दिग्दर्शक प्रताप पोथेन यांचे चेन्नईत निधन

तुम्ही इतके मोठे चमचे आहात की त्यांना तुम्ही चांगले श्रोते म्हणत आहात. सर्वात चांगले श्रोते तर मनमोहन सिंग होते. जे नेहमी सोनिया गांधींचे ऐकत होते. विवेक अग्निहोत्री यांचा चित्रपट काश्मीर फाईल्स हा विवादात अडकला होता. तरीही चांगली कामगिरी केली. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही लोकांना हा चित्रपट पाहण्याचे आवाहन केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com