Vivek Agnihotri: "राष्ट्रीय पुरस्कार मिळायलाच हवा!"; विवेक अग्निहोत्रींनी केलं 'बाईपण भारी देवा'चं तोंडभरुन कौतुक

Vivek Agnihotri: द कश्मीर फाईल्स (The Kashmir Files) चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri ) यांनी 'बाईपण भारी देवा' या चित्रपटाचं कौतुक केलं आहे.
Vivek Agnihotri
Vivek Agnihotri

Baipan Bhaari Deva: दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांचा बाईपण भारी देवा (Baipan Bhaari Deva) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. या चित्रपटाचं अनेकांनी कौतुक केलं. अशातच आता द कश्मीर फाईल्स (The Kashmir Files) चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri ) यांनी देखील या चित्रपटाचं कौतुक केलं आहे.

विवेक अग्निहोत्री यांची पोस्ट

विवेक अग्निहोत्री यांनी इन्स्टाग्रामवर बाईपण भारी देवा या चित्रपटाचं पोस्ट शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'काल मी बाईपण भारी देवा पाहिला. गेल्या काही दिवसांत एवढा सुंदर सिनेमा मी खरंच पाहिला नव्हता. हा चित्रपट ऑस्करच्या पात्र तर आहे, या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळायलाच हवा. सगळ्यांचे अतिशय जबरदस्त काम, खूप सुंदर लिखाण आणि केदार शिंदे यांचे दर्जेदार दिग्दर्शन या सिनेमात आहे. केदारने यातील बारकावे, टायमिंग आणि छोट्या छोट्या गोष्टींवर बारकाईने काम केलंय. रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर, दीपा चौधरी यांच्या कामाचे कौतुक करायला माझ्याकडे शब्द नाहीत. मी या चित्रपटाच्या सर्व टीमला शुभेच्छा देतो. हा चित्रपट नक्की बघा आणि नंतर मला थँक्यू म्हणा. '

विवेक अग्निहोत्री यांची ही पोस्टर केदार शिंदे यांनी रिपोस्ट केली आहे. विवेक अग्निहोत्री यांची पोस्ट रिपोस्ट करुन केदार शिंदे यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, "थँक्यू सर"

Baipan Bhaari Deva
Baipan Bhaari Deva

बाईपण भारी देवा हा चित्रपट गेल्या वर्षी रिलीज झाला.  रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, दीपा परब, सुचित्रा बांदेकर आणि शिल्पा नवलकर यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाच्या कथानकाला आणि चित्रपटांमधील गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com