The Vaccine War: बॉक्स ऑफिसवर फेल झालेल्या 'द व्हॅक्सिन वॉर'ला ऑस्कर अकादमीकडून 'गुडन्यूज'

'The Vaccine War', which failed at the box office, gets 'Good News' from Oscar Academy...
The Vaccine War Selected For Oscar Library:
The Vaccine War Selected For Oscar Library:Esakal

The Vaccine War For Oscar Library:

'द काश्मिर फाईल्स'च्या यशानंतर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री त्यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'द व्हॅक्सिन वॉर' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. एकीकडे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला असला तरी दुसरीकडे या चित्रपटावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

या चित्रपटाबाबत समिक्षकांनी देखील समिंश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहता हा सिनेमा फ्लॉप ठरल्याचं बोललं जात आहे. असं असलं तरी आता अग्निहोत्रींच्या 'द व्हॅक्सिन वॉर' ने जागतिक स्तरावर मोठी कामगिरी केली आहे. आता हा सिनेमा जगभर आपल्या देशाचं नाव मोठं करणार आहे. 'द व्हॅक्सिन वॉर' चित्रपटाला आता थेट ऑस्करच्या लायब्ररीत स्थान मिळाले आहे.


(The Vaccine War Selected For Oscar Library)

The Vaccine War Selected For Oscar Library:
Archana Gautam : 'मला अन् वडिलांना मारण्यासाठी....' बिग बॉस फेम अर्चनानं प्रियंका गांधींवर केला मोठा आरोप

एकीकडे विवेक अग्रीहोत्रीच्या द व्हॅक्सिन वॉर बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करण्यासाठी धडपड करत आहे तर दुसरीकडे चित्रपटाने थेट ऑस्करमध्ये मजल मारल्याने आता पुन्हा अग्रीहोत्रीं चर्चेत आले आहे. या चित्रपटाला ऑस्कर अकादमीकडून विनंती पत्र मिळाले आहे.

दिग्दर्शक-लेखक विवेक अग्निहोत्री यांनी याबाबत खुलासा करत त्यांच्या चाहत्यांना ही बातमी दिली आहे. अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस लायब्ररीकडून दिग्दर्शक-लेखक विवेक अग्निहोत्री यांनी ईमेल प्राप्त झाला आहे. द व्हॅक्सिन वॉरची स्क्रिप्ट आता लवकरच ऑस्कर लायब्ररीच्या मुख्य संग्रहाचा भाग असेल.

The Vaccine War Selected For Oscar Library:
P V Gangadharan: लोकप्रिय निर्माते - दिग्दर्शक पी.व्ही. गंगाधरन यांचं निधन, इंडस्ट्रीवर शोककळा

विवेक अग्निहोत्री यांनी इंस्टाग्रामवर 'मला अभिमान आहे की द व्हॅक्सीन वॉरची स्क्रिप्ट ऑस्कर अकादमीच्या लायब्ररीच्या संग्रहात ठेवण्यासाठी आमंत्रित करण्यात आली आहे. मला आनंद आहे की शेकडो वर्षांपर्यंत लोक भारतीय सुपरहीरोची ही महान कथा वाचतील.' असं कॅप्शन देत या इमेलचा स्क्रिनशॉट शेयर केला आहे.

'द व्हॅक्सिन वॉर'च्या कथेबद्ल बोलयचं झालं तर या चित्रपटात लस बनवण्यासाठी भारतीय शास्त्रज्ञांचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. कोरोना काळात डॉक्टर आणि वैज्ञानिकांच्या योगदान आणि परिश्रम या चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

The Vaccine War Selected For Oscar Library:
Aaliyah Qureishi: थायलंडच्या मॉलमध्ये गोळीबार, जवान मधील अभिनेत्री थोडक्यात वाचली

या चित्रपटात नाना पाटेकर, सप्तमी गौडा, पल्लवी जोशी आणि रायमा सेन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटात नाना, सप्तमी आणि पल्लवी यांनी वैज्ञानिकांच्या भूमिका साकारल्या आहेत, तर रायमा पत्रकाराच्या भूमिकेत आहे. निवेदिता भट्टाचार्य आणि मोहन कपूर आणि अनुपम खेर यांचीही महत्त्वाची भूमिका आहे.

या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली नसली तरी टाईम्स स्क्वेअरवर गाणे लॉन्च करणारा पहिला भारतीय चित्रपट होण्याचा विक्रम या चित्रपटाच्या नावे आहे. आता तर ऑस्करने देखील या सिनेमाची दखल घेतली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com