
दिव्यांकाच्या प्रेग्नेंसी अफवांवर विवेक जे बोलला..."दुसऱ्यांची मुलं आवडतात पण स्व:ताची..."
प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी (Divyanka Tripathi) आणि विवेक दहिया (Vivek Dahiya) यांची जोडी टेलिव्हिजनमधील प्रसिद्ध जोडीपैकी एक आहे.अवघ्या काही महिन्याच्या डेटिंगनंतर या जोडप्याने लग्नाचा निर्णय घेत २०१६ मधे थाटामाटात लग्न केलं.लग्नानंतर अनेकदा दिव्यांकाच्या प्रेग्नेंसीची बातम्या सोशल मीडियावर वायरलही झाल्यात.मात्र यावर दिव्यांरकाचा नवरा विवेक दहियानं जे म्हटलं ते वक्तव्य भलतंच चर्चेत आहे.
एकदा विवेकच्या लाईव्ह सेशनमधे एका फॅनने विवेकला दिव्यांकाच्या प्रेग्नेंसीवर प्रश्न विचारला होता.त्यावर विवेक रागावत म्हणाला दिव्यांका प्रेग्नेंट नाही आणि आमचा सध्या मुल जन्माला घालण्याचा काही प्लॅनही नाही.अनेकदा दिव्यांकाच्या प्रेग्नेंसीबाबत सोशल मीडियावर अफवा उडाल्या आहेत.यावेळी मात्र विवेकने यावर मोठं वक्तव्य केलं आहे.
अनेकांना माहिती नसेल की विवेकने नुकताच एक चित्रपट साईन केलाय ज्याचं नाव आहे 'मेरा बाप कौन है' या चित्रपचटाच्या चर्चेदरम्यान त्याच्या वयक्तिक जीवनातल्या विषयावर बोलताना तो म्हणतो, 'मी माझ्या आगामी चित्रपटात वडिलांची भूमिका साकारत आहे.विवेकने पहिल्यांदा पडद्यावर वडिलांची भूमिका करण्याचं धाडस केलंय.'
विवेकला जेव्हा खऱ्या आयुष्यात वडिलांच्या भूमिकेबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा विवेक म्हणाला, 'मला मुलं आवडतात पण स्वत:चे मुलं जन्माला घालण्याची अजून तरी हिम्मत होत नाहीये.म्हणून पडद्यावर वडिलांची भूमिका साकारणं मला मजेशिर वाटलं.'त्याच्या या विधानाची सगळीकडे सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
Web Title: Vivek Dahiya Revealed On Divyanka Tripathi Pregnancy News Personal Life Kids
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..