Vivek Oberoi : प्रसिद्ध अभिनेता विवेक ऑबेरॉयला दीड कोटींना गंडा घालणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता विवेक ऑबेरॉयला तब्बल दीड कोटींना गंडा घालणाऱ्याला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्याची माहिती पुढे आली आहे.
Vivek Oberoi Fraud case
Vivek Oberoi Fraud case esakal

Vivek Oberoi bollywood Actor 1.5 core fraud case andheri MIDC police: बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता विवेक ऑबेरॉयला तब्बल दीड कोटींना गंडा घालणाऱ्याला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्याची माहिती पुढे आली आहे. काही दिवसांपूर्वी विवेकला चित्रपट निर्मितीत पैसे गुंतवणूक करुन चित्रपट तयार करण्यासंबंधी एकानं विचारणा केली होती.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर... फॉलो करण्यासाठी या लिंकवर करा क्लिक)

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंधेरी एमआयडीसी पोलिसांनी संजय शहा नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. एबीपी माझा वृत्तवाहिनीनं याबाबत वृत्त दिले होते. याप्रकरणात अंधेरी एमआयडीसी पोलिसांनी तीन जणांवर गुन्हा दाखल केला होता. एंटरटेनमेंट अँड कंपनीला चित्रपट निर्मितीसाठी विवेकला १कोटी ५५ लाख रुपयांची गुंतवणूक करण्यास सांगितले गेले होते.

चित्रपट निर्मिती न करता संबंधित आरोपीनं ते पैसे स्वताच्या फायद्यासाठी वापरल्याचे दिसून आले. यानंतर विवेकनं तातडीनं पोलिसांशी संपर्क साधून दाद मागितली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com