Vivek Oberoi : 'सगळ्यांना जड होतो, सुपरस्टार झालो असतो, पण... कुणाबद्दल आहे एवढा राग?

बॉलीवूडमध्ये ज्या दोन अभिनेत्यांचे वैर हे नेहमीच चर्चेचा विषय राहिला त्यापैकी एकानं पुन्हा एकदा त्यावेळच्या गोष्टींना उजाळा दिला आहे.
Vivek Oberoi
Vivek Oberoiesakal

Vivek Oberoi bollywood actor bhaijan salman khan controversy viral : बॉलीवूडमध्ये ज्या दोन अभिनेत्यांचे वैर हे नेहमीच चर्चेचा विषय राहिला त्यापैकी एकानं पुन्हा एकदा त्यावेळच्या गोष्टींना उजाळा दिला आहे. बॉलीवूडचा भाईजान सलमान खान आणि विवेक ऑबेरॉय यांच्यातील भांडणं ही नेहमीच त्यांच्या चाहत्यांसाठी चर्चेचा विषय राहिला आहे.

एका मुलाखतीमध्ये विवेकनं त्या गोष्टींवर प्रतिक्रिया देताना आपण आजवर दोन दशकांहून अधिक काळ बॉलीवूडमध्ये कार्यरत आहोत. मात्र आपल्याला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला आहे. हे फार कमी जणांना माहिती आहे. मी देखील बॉलीवूडमध्ये चांगले काम केले. प्रेक्षकांनी मला स्विकारले, पण माझे यश फार कमी जणांना पाहवले. याची खंत नेहमीच राहणार. असेही विवेकनं सांगितले आहे.

Also Read- काय आहे सलाम किंवा कुर्निसाताचे महत्त्व राजशिष्टाचारांमध्ये

तुम्हाला सांगतो २००७ मध्ये मी शुटआऊट लोखंडवाला सारखी हिट फिल्म दिली होती. मात्र त्यानंतर दीड वर्ष माझ्याकडे एकही फिल्म नव्हती. मी खूप टेन्स झालो होतो. मला प्रश्न पडत होते. मी काय केलं आहे, माझा कुणावरही राग नाही. मी कुणाचा द्वेषही केला नाही. अशावेळी माझ्या वाट्याला हे सगळं का येत आहे, तुमच्याविरोधात जर दहा ते पंधरा माणसं बोलत असतील त्यांना तुम्हाला कंट्रोल करता येतं. मात्र त्यांची संख्या वाढली तर आपण काहीही करु शकत नाही. असेही विवेकनं म्हटलं आहे.

Vivek Oberoi
Salman Khan: तो साठीच्या जवळ, बॉलिवूडमधली 'ती' तिशीतली! 'डेटिंग' सुरु...

मला काम मिळणं बंद झालं होतं.....

मी खरं सांगतो मात्र त्या प्रसंगानंतर मला काम मिळणं बंद झालं होतं. बऱ्याचजणांनी त्याचा संबंध सलमान आणि माझ्या भांडणाशी लावला होता. आमच्यातील भांडणं कोणत्या ना कोणत्या निमित्तानं ही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसून येतात. मला त्यावर काही बोलायचे नाही. पण एक गोष्ट आहे ती म्हणजे मी बॉलीवूडमध्ये मोठं नाव कमविण्यासाठी आलो होतो. त्याची सुरुवातही वेगानं झाली होती. पण काहींना ती पाहवली नाही. आपल्याकडे जेलसी खूप आहे. खासकरुन आमच्या फिल्डमध्ये. यावेळी विवेकनं कुणाचं नाव घेणं टाळलं. मात्र त्याचा रोख कुणाकडे आहे हे अनेकांनी बरोबर ओळखलं आहे.

विवेकनं त्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की, आपण आता खूप पुढे निघुन आलो आहोत. गेल्या काही वर्षांपासून आपल्यामध्ये खूप फरक पडला आहे. पहिल्यांदा माझ्यावर रागीट असल्याचा शिक्का मारला गेला होता. तो आता मी माझ्या कामातून पुसला आहे. विवेकची ओटीटीवर धारावी बँक नावाची मालिका प्रदर्शित झाली आहे. त्यामध्ये त्यानं एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका केली होती. जी चाहत्यांना पसंत पडली आहे. मात्र काहीही असलं तरी त्याच्या मनातून सलमान आणि त्यानं त्याच्याशी घेतलेला पंगा हे विसरता आलेलं नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com