Vivek Oberoi : '....त्यामुळे मी देखील नैराश्यात गेलो होतो'! विवेक ऑबेरॉयनं केला मोठा खुलासा!

बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता विवेक ऑबेरॉय हा त्याच्या वेगळ्या प्रतिक्रियेसाठी ओळखला जाणारा सेलिब्रेटी आहे.
Vivek Oberoi Slipping into Depression and Career Challenges
Vivek Oberoi Slipping into Depression and Career Challengesesakal

Vivek Oberoi Slipping into Depression and Career Challenges : बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता विवेक ऑबेरॉय हा त्याच्या वेगळ्या प्रतिक्रियेसाठी ओळखला जाणारा सेलिब्रेटी आहे. त्याच्या यापूर्वीच्या व्हायरल मुलाखतींना चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. सध्या त्याचा बहुचर्चित इंडियन पोलीस फोर्स नावाची वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या मालिकेच्या प्रमोशनमध्ये सध्या विवेक ऑबेरॉय व्यस्त असल्याचे दिसून आले आहे. त्यानिमित्तानं आपण काही व्यक्तींमुळे मानसिक तणावात असल्याचा गौप्यस्फोट केल्याचे म्हटले आहे.याबाबत टाईम्स ऑफ इंडियानं सविस्तर वृत्त दिले आहे. त्यात म्हटल्याप्रमाणे, त्यानं नवोदित तरुणांना अनेक महत्वाचे सल्ले दिले आहेत. तो म्हणतो की, मला तरुणांनी येणाऱ्या नव्या आव्हानांचा सक्षमपणे सामना करण्याची गरज आहे.

मिर्ची प्लसला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये विवेकनं त्याच्या आगामी इंडियन पोलीस फोर्सविषयी सविस्तरपणे सांगितले आहे. तो म्हणाला की, दरवेळी नवनवीन आव्हानं घेऊन त्याचा सामना करणे मला आवडते. रोहित शेट्टीनं त्या मालिकेचे दिग्दर्शन केले असून त्यामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा अन् शिल्पा शेट्टीची महत्वाची भूमिका आहे.

जेव्हा तुमचे करिअर संपते किंवा संपवले जाते त्यावेळी तुमच्याकडे कोणताही चॉईस नसतो असे तुम्हाला वाटते. मात्र आपण आपल्या सभोवताली जी परिस्थिती आहे त्याच्याशी सामना करण्याची गरज आहे. मी देखील मोठ्या अपयशाचा सामना केला आहे. त्यावेळी मी देखील नैराश्यात गेलो होतो. त्यातून बाहेर येणे अवघड होते. पण मी त्या परिस्थितीचा सामना केला. अशा शब्दांत विवेकनं त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

तुमचा वाईट काळ सुरु आहे तेव्हा घाबण्याची गरज नाही. ती वेळ कायमस्वरुपी नाही. थोड्यावेळासाठी आहे. त्यामुळे त्या परिस्थितीला सामोरं जाण्याची डेरिंग तुम्ही ठेवली पाहिजे. उद्याचा दिवस तुमच्यासाठी वेगळा असेल अशी आशा तुम्ही बाळगली पाहिजे. अशा शब्दांत विवेकनं त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

------------------------------------------------------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com