
मुंबई- बाॅलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची घटना कळताच अनेकांना खूप दुःख झालं. सुशांतच्या पार्थिवावर सोमवारी (१५ जून) अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी चित्रपटसृष्ट्रीतील काही कलाकार मंडळी उपस्थित होते. या मोजक्या कलाकारांमध्ये अभिनेता विवेक ओबेरॉयसुद्धा होता. त्यावेळी अंत्यविधीला उपस्थित राहिल्यानंतर विवेकने चित्रपटसृष्टीसाठी एक खुलं पत्र लिहिलं.
अंत्यसंस्कारावेळी तसेच या इंडस्ट्रीत राहून त्याला जे काही जाणवले त्याबद्दल विवेकने या पत्रात असे लिहिले आहे की, 'सुशांतच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहून आज मन खूपचं हेलावून गेलं. मला एकदा त्याच्याशी बोलण्याची संधी मिळाली असती तर मी माझा अनुभव सांगून त्याच्या वेदना कमी करण्याचा नक्कीच प्रयत्न केला असता'. या वेदनांच्या प्रवासात सुरवातीला मीसुद्धा होतो आणि हे खूप त्रासदायक असतं. पण यावर आत्महत्या हा उपाय असू शकत नाही. आपल्या मुलाला मुखाग्नी देताना त्याच्या वडिलांच्या डोळ्यात जे दु:ख होतं, ते सहनशक्तीपलीकडचं होतं. त्याची बहीण त्याला परत ये म्हणत जोरजोरात रडत होती' अशा शब्दांत विवेकने आपल्या भावना व्यक्त केल्या.
तसेच सुशांतच्या आत्महत्येसाठी इंडस्ट्रीसुध्दा कशाप्रकारे जबाबदार आहे, हेसुद्धा विवेकने पुढे पत्रात लिहिले आहे.. 'नेहमीच इंडस्ट्री स्वत:ला एक कुटुंब म्हणते, तिला आता आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. एकमेकांबद्दल गॉसिप कमी करुन आणि त्यांची काळजी जास्त करायला हवी. तसेच अहंकार कमी करून सर्वांकडे लक्ष देण्याची गरज आहे. या इंडस्ट्रीमध्ये प्रतिभेला खतपाणी मिळालं पाहिजे. आणि ती पायाखाली चिरडली गेली नाही पाहिजे.
आपल्या इथे सर्वच कलाकारांचे कौतुक झाले पाहिजे, त्यांचा वापर नाही. सद्य परिस्थिती पाहता आपण सर्वांनी डोळे उघडून पाहण्याची हीच वेळ आली आहे, असं म्हणत त्याने इंडस्ट्रीला खूपचं ऐकवलं आहे.
vivek oberoi shares details of sushant singh rajputs funeral calls it a wake up call for film industry
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.