हॉवर्ड विद्यापीठातून विवेक ओबेरॉयला निमंत्रण

वृत्तसंस्था
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

अभिनेता विवेक ओबेरॉयला बॉलीवूडवर विस्तारित बोलण्यासाठी हॉवर्ड विश्‍वविद्यालयाने विशेष निमंत्रण पाठवलंय. तिथे विवेक विद्यार्थ्यांना संबोधित करणार आहे आणि चित्रपट व सिने इंडस्ट्रीबद्दलची माहिती सांगणार आहे. याबाबत विवेक सांगतो की, माझ्यासाठी ही सन्मानाची बाब आहे की, मला हॉवर्ड विश्‍वविद्यालयातून प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण देण्यात आलंय. मी सर्व क्षेत्रातील लोकांना भेटण्यासाठी व आदरणीय वक्‍त्यांना ऐकण्यासाठी खूपच उत्सुक आहे. 

अभिनेता विवेक ओबेरॉय तमीळ चित्रपट "थाला 57' आणि एका वेब सीरिजसह राम गोपाल वर्मांचा चित्रपट "राय'मध्ये अंडरवर्ल्ड डॉन मुत्थप्पा रायच्या भूमिकेत दिसणार आहे. थोडक्‍यात, हे वर्ष विवेकसाठी खूप खास असणार असं दिसतंय. आता हॉवर्ड विश्‍वविद्यालयात त्याच्या खास विवेकी अंदाजात कसं व्याख्यान देतोय आणि बॉलीवूडविषयी नेमकं तो काय सांगणारेय, यासाठी थोडी वाट पाहावी लागेल. तोपर्यंत व्याख्याते विवेक ओबेरॉयना शुभेच्छा देऊया... 

Web Title: Vivek Oberoi to talk on Bollywood at Harvard University