ऐश्वर्या आणि आराध्याला कोरोना झाल्याचं कळाल्यावर विवेक ऑबेरॉयने केलं ट्विट..

दिपाली राणे-म्हात्रे, प्रतिनिधी
Monday, 13 July 2020

ऐश्वर्या-आराध्या पॉझिटीव्ह आल्याची बातमी कळताच अभिनेता विवेक ऑबेरॉयने देखील त्यांच्यासाठी आणि संपूर्ण बच्चन कुटुंबासाठी चांगल्या आरोग्याची प्रार्थना केली आहे. त्यामुळे विवेक सोशल मिडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.

मुंबई-  अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना शनिवारी कोरोनाचा संसर्ग झाल्याचं कळताच इंडस्ट्रीमधील अनेकांना धक्का बसला. त्यानंतर लगेचच रविवारी ऐश्वर्या बच्चन आणि मुलगी आराध्या यांची कोविड-१९ टेस्ट देखील पॉझिटीव्ह आली. बच्चन कुटुंब यातून लवकरात लवकर बाहेर पडावं यासाठी सेलिब्रिटींपासून ते सामान्यमाणसांपर्यंत सगळेच प्रार्थना करत आहेत. ऐश्वर्या-आराध्या पॉझिटीव्ह आल्याची बातमी कळताच अभिनेता विवेक ऑबेरॉयने देखील त्यांच्यासाठी आणि संपूर्ण बच्चन कुटुंबासाठी चांगल्या आरोग्याची प्रार्थना केली आहे.

धक्कादायक : अभिनेत्री दिव्या चोक्सीचे कर्करोगाने निधन

अभिनेता विवेक ऑबेरॉयने रविवारी त्याच्या ट्विटवरवरुन ट्विट केलं आहे. विवेकने लिहिलंय,  'बच्चन कुटुंबाच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि ते लवकर बरे व्हावेत यासाठी आमच्या प्रार्थना त्यांच्या कुटुंबासोबत आहेत.' याआधी विवेकने अमिताभ आणि अभिषेक यांच्या तब्येतीसाठी देखील प्रार्थना केली होती.

विवेकने लिहिलं होतं की, 'अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन हे लवकर बरे व्हावेत. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करत आहोत. लवकरात लवकर बरे होऊन या. काळजी घ्या.'विवेकने ऐश्वर्या आणि आराध्याच्या तब्येतीसाठी केलेलं ट्वीट सोशल मिडियावर चांगलंच चर्चेत आहे. 

ऐ्श्वर्या आणि विवेक यांचं अफेअर बॉलीवूडमधलं चांगलंच चर्चेत असलेलं अफेअर होतं. मात्र सलमान खानमुळे त्यांच्यामध्ये दुरावा आल्याचं म्हटलं जातं. त्यानंतर कधीही विवेक आणि ऐश्वर्या एकमेकांबाबत बोलले नाहीत. मात्र विवेकला ऐश्वर्या आणि आराध्याच्या तब्येतीबाबत कळताच त्याने त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी ट्विट केलं आहे. त्यामुळे विवेक सोशल मिडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.

कोरोनाचा संसर्ग झाला आहे हे समजल्यावर अमिताभ आणि अभिषेक मुंबईतील नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत. तर ऐश्वर्या आणि आराध्या घरातंच क्वारंटाईन आहेत. बीएमसीने रविवारी सकाळी अमिताभ यांचा जलसा बंगला सॅनिटाईज केला आहे. तसंच त्याला कंटेन्मेंट झोन असं जाहीर करुन त्याला सील केलं आहे. इतकंच नाही तर अमिताभ यांचे चारही बंगले सील केले गेले आहेत.  

vivek oberoi wishes bachchan family speedy recovery  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vivek oberoi wishes asihwarya and bachchan familys speedy recovery