रेहमान यांच्यासोबत काम करायचंय : सेलेना गोमेझ 

वृत्तसंस्था
शनिवार, 21 जुलै 2018

''रेहमान आणि त्यांची गाणी मला आवडतात. त्यांची गाणी जगभरात प्रसिद्ध आहेत. त्यांच्यासोबत मला गाणं गाण्याची इच्छा आहे. तसेच ती पुढे म्हणाली, मी भारतातील काही गायकांना फॉलो करते. त्यापैकी रेहमान एक आहेत''. 

- सेलेना गोमेझ, अमेरिकेतील गायिका

नवी दिल्ली : अमेरिकेतील प्रसिद्ध गायिका सेलेना गोमेझने भारतातील प्रसिद्ध संगीतकार एआर रेहमान यांच्यासोबत काम करायचे आहे, अशी इच्छा व्यक्त केली. त्याबाबत तिने सांगितले, की ''मला रेहमान आणि त्यांची गाणी खूप आवडतात. रेहमान आज संपूर्ण जगात नावाजलेली अशी व्यक्ती आहे'', अशा शब्दांत सेलेनाने रेहमान यांची प्रशंसा केली.

संगीतकार एआर रेहमान यांचे देशासह जगभरात असंख्य चाहते आहेत. त्यांच्यासोबत काम करण्यास अनेक जण इच्छुक आहेत. अमेरिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री, गायिका आणि निर्मात्या म्हणून सेलेना गोमेझ यांची ओळख असून, तिने रेहमान यांच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. याबाबत सेलेना म्हणाली, ''रेहमान आणि त्यांची गाणी मला आवडतात. त्यांची गाणी जगभरात प्रसिद्ध आहेत. त्यांच्यासोबत मला गाणं गाण्याची इच्छा आहे. तसेच ती पुढे म्हणाली, मी भारतातील काही गायकांना फॉलो करते. त्यापैकी रेहमान एक आहेत''. 

Web Title: Wants work with Rehman says Selena Gomez