'Godzilla Vs Kong' चा ट्रेलर पाहिलायं;अंगावर काटे उभे राहतील

सकाळ ऑनलाईन टीम
Monday, 25 January 2021

अप्रतिम छायाचित्रण, संगीत, संकलन, ग्राफिक्स यांचा वापर मोठ्या खुबीनं करण्यात आला आहे. दिग्दर्शक विंगार्ड यांनी 'Godzilla Vs Kong' हा चित्रपट काँगची कथा असल्याचे सांगतात.

मुंबई -  जगात लोकप्रिय झालेल्या गॉडझिला आणि किंग काँग चित्रपटानं प्रेक्षकांच्या पसंतीचा विषय ठरला होता.या चित्रपटाच्या अनेक भागांनी मोठा व्यवसाय केल्याचे दिसून आले आहे. आता  WB या जगप्रसिध्द चित्रपट निर्मिती कंपनीनं आता आपला नवा चित्रपट तयार केला आहे. 'Godzilla Vs Kong' असे त्या चित्रपटाचे नाव आहे. नुकताच त्याचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अवघ्या काही तासांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रचंड दर्शक मिळाले आहेत.

अॅडम विंगार्डव्दारा दिग्दर्शित 'Godzilla Vs Kong' चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर अंगावर काटे उभे राहतात. चित्रपटात किंग काँग हा सकारात्मक विचारांचे प्रतिक तर गॉडझिला हा नकारात्मक विचारांचे प्रतिक म्हणून दाखविण्यात आले आहे. सत्य आणि असत्य यांच्यातील लढा दिग्दर्शकानं परिणामकारकपणे साकारला आहे. ट्रेलरच इतका जबरदस्त झाला आहे की त्यामुळे चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे. हा चित्रपट 26 मार्च रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. अमेरिकन मॉन्स्टर म्हणून प्रसिध्द असणारा हा चित्रपट अनेकांचे लक्ष वेधून घेणारा ठरेल यात शंका नाही. कोरोनाचा मोठा फटका मनोरंजन क्षेत्राला बसला आहे. त्यामुळे निर्माते आणि दिग्दर्शक यांना आर्थिक समस्येला सामोरे जावे लागले आहे. लॉकडाऊनचा मोठा फटका चित्रपट प्रदर्शनावर बसला आहे.

आता कुठे परिस्थिती सुधारत असताना मनोरंजन क्षेत्रात काही अंशी बदल होतान दिसत आहेत. चित्रपट प्रदर्शित होत आहेत. याशिवाय अनेक वेबसीरिजही मोठ्या संख्येनं ओटीटी प्लॅटफॉर्मवरुन रिलीज होत आहेत. या बदलाचा प्रेक्षकांनी स्वीकार केला आहे. अशावेळी 'Godzilla Vs Kong' हा नवा चित्रपट प्रेक्षकांना वेगळा अनुभव देणारा ठरणार आहे. येत्या 26 मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती करणा-या निर्मात्यांचे यापूर्वीचे दोन्ही चित्रपट कमालीचे लोकप्रिय झाले होते. त्यांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. या अगोदरच्या ट्रेलरमध्ये दोन राक्षसांची लढाई दाखविण्यात आली होती. आताही त्यांच्या लढाईनं भारावून जायला होते.

 'कपिल शर्मा शो’ बंद होणार कारण ...

अप्रतिम छायाचित्रण, संगीत, संकलन, ग्राफिक्स यांचा वापर मोठ्या खुबीनं करण्यात आला आहे. दिग्दर्शक विंगार्ड यांनी 'Godzilla Vs Kong' हा चित्रपट काँगची कथा असल्याचे सांगतात. तो आपले खरे घर शोधण्यासाठी समुद्र पार करुन आलेला आहे. ट्रेलरमध्ये जियॉलॉजिस्ट सांगतात की, आपल्याला काँगची गरज आहे. तसेच सा-या जगाला त्याची गरज आहे. त्यामुळे भविष्यात होणारे धोके टळण्यास मदत होईल. अन्यथा आपला विनाश अटळ आहे. 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: warner bros released film Godzilla vs Kong trailer released on social media