3 idiots : '3 इडियट्स'चा सिक्वेल येणार? आमिर, शर्मन, आर. माधवन आले एकत्र अन्...

3 idiots
3 idiots

मुंबई - अभिनेता शर्मन जोशीने अलीकडेच त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ टाकला ज्यामध्ये तो त्याच्या '3 इडियट्स'मधील सहकलाकार आमिर खान आणि आर. माधवन यांच्यासोबत 14 वर्षांनंतर पुन्हा एकत्र दिसला. '3 इडियट्स' सिनेमा सुपरहिट ठरला होता. शिवाय या चित्रपटाने तरुणाई अक्षरश: भुरळ घातली होती. अनेक विद्यार्थ्यांनी हा चित्रपट अनेकदा पाहिला होता. आता या चित्रपटाच्या सिक्वेलची चर्चा सुरू झाली आहे. ('3 idiots' Aamir Khan, Sharman Joshi, R Madhavan reunite)

3 idiots
Narayan Rane : भाजपमध्ये आल्याने अडचणीत आलो; फडणवीसांसमोरच नारायण राणेंचं विधान

इंस्टाग्रामवर शर्मनने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात त्याने कॅप्शन दिले, "3 इडियट्स आज रिलीज होत असलेल्या 'कॉग्रेज्युलेशन' चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत.

व्हिडिओमध्ये, तिन्ही कलाकार क्रिकेटच्या स्टेडियमवर दिसत असून तिघांनी लाल रंगाचे कपडे परिधान केलेले दिसतात. शर्मनने त्याचा आगामी गुजराती चित्रपट ' कॉग्रेज्युलेशन' बद्दल बोलण्याचा प्रयत्न करतो, त्याचवेळी.माधवन त्याच्याकडे येतो आणि त्याच्या चित्रपटाबद्दल विचारतो. त्यानंतर, शर्मन पुन्हा त्याच्या चित्रपटाबद्दल बोलण्याचा प्रयत्न करतो. मात्र आमिर खानने व्यत्यय आणला. नंतर दोन्ही कलाकार चित्रपटाच्या शीर्षकाबद्दल गोंधळले दिसून येतात. मग अखेर शर्मन कंटाळून कॅमेरा बाजुल घेऊन जाताना दिसतो.

दरम्यान शर्मनच्या पोस्टवर चाहत्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत. अनेक चाहत्यांनी '3 इडियट्स' चित्रपटाचा सिक्वेल आणण्याची मागणी केली. अनेकांनी तिघं एकत्र आल्याबद्दल आनंद व्यक्त केला. तर एका चाहत्याने तुम्हा तिघांना एकत्र पाहून भारावून गेल्याच म्हटलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com