
Pathaan: 'आम्ही इतके जवळ आलो की एकमेकांना किस केलं असतं कारण...', जॉनचा तो किस्सा ऐकून सगळे शॉक
Shahrukh Khan Press Conference: पाचशे करोडचा टप्पा ओलांडत किंग खानच्या पठाणनं आता १००० कोटी करण्याकडे आपली घोडदौड सुरू केली आहे. तब्बल ४ वर्षांनी मोठ्या पडद्यावर झळकलेल्या शाहरुखनं वयाच्या ५७ व्या वर्षातही तोच बॉलीवूडचा बादशहा आहे हे सिद्ध केलंय.
आज पठाणचं यश आपल्या चाहत्यांसोबत शेअर करण्यासाठी.. शाहरुख खाननं एक पत्रकार परिषद घेतली होती. शाहरुखसोबत जॉन अब्राहम आणि दीपिका पदूकोण, दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद सोबत हजर आहेत. यावेळी शाहरुखने जॉन आणि त्याचा सेटवर घडलेला एक धम्माल किस्सा शेयर केला..चला जाणून घेऊया.
शाहरुख खान आणि जॉन अब्राहम यांच्या मैत्रीचा धम्माल किस्सा पाहायला मिळाला. शाहरुख म्हणाला,"जॉनची बॉडी बघून मलाही बॉडी करायची होती. आमचे खतरनाक ऍक्शन सिक्वेन्स आहेत. जॉनने सुद्धा मला वर्क आऊट करायला शिकवला. माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे. एकावेळी आम्ही इतके जवळ आले होतं कि आम्ही एकमेकांना किस केलं असतं. हे प्रेम एकतर्फी नाही तर जॉन सुद्धा माझ्यावर तितकं प्रेम करतो." असं शाहरुख खान गमतीत म्हणाला.
शाहरुख पुढे म्हणाला,"जॉन ऍक्शन सिक्वेन्स करताना खूप काळजी घेतो. माझ्यामुळे दुसऱ्याला लागणार नाही याची काळजी जॉन घेतो. ऍक्शन करताना जॉन अनेक रिहर्सल करतो" असं शाहरुख म्हणाला. जॉनने सुद्धा शाहरुख बद्दल एक महत्वाचं वाक्य वापरलं,"शाहरुख खान हा अभिनेता नाही तर ती एक भावना आहे" अशाप्रकारे पठाण च्या पत्रकार परिषदेत जॉन आणि शाहरुख यांचा धम्माल अन्दाज पाहायला मिळाला
25 जानेवारीला सिद्धार्थ आनंद च्या दिग्दर्शना अंतर्गत बनलेल्या पठाण मध्ये प्रेक्षकांना शाहरुख खान आणि दीपिकामधील रोमान्स आणि जॉन अब्राहमचा खलनायकी अंदाज पहायला मिळाला. 'पठाण' च्या म्युझिकपासून कॉसश्युम पर्यंत सगळ्याचीच चर्चा रंगली आहे.