
Pathaan 2: शाहरुखचा 'पठाण' पाहिलात का?, सिनेमातील 'या' सीन मध्ये दडलीय 'पठाण'च्या सीक्वेलची घोषणा...
Pathaan 2: शाहरुख खान,दीपिका पदूकोण,जॉन अब्राहम,डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा यांचा 'पठाण' सिनेमागृहात रिलीज झाला आहे. यशराज फिल्म्सच्या या स्पाय युनिव्हर्स सिनेमाला बॉक्सऑफिसवर उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. 'पठाण' मध्ये 'वॉर' चा कबीर आणि 'टायगर' सीरिजची झलकही निर्मात्यांनी दाखवलेली आहे. प्रेक्षक सहज या सगळ्याची एकमेकाशी लिंक लावताना दिसत आहेत आणि याचा आनंदही घेताना दिसत आहेत.
सध्या सिनेमागृहात 'पठाण' पहायला गर्दी होतेय. बहुतांशी प्रेक्षक सिनेमाची प्रशंसा करताना दिसत आहेत. अशामध्ये जर लोकांना कळेल की 'पठाण 2' येतोय तर मग लोकांच्या रिअॅक्शन कशा असतील..हो,नुकतंच 'पठाण'च्या सीक्वेलची हिंटही मिळाली आहे.
25 जानेवारीला सिद्धार्थ आनंद च्या दिग्दर्शनाअंतर्गत बनलेल्या पठाण मध्ये प्रेक्षकांना शाहरुख खान आणि दीपिकामधील रोमान्स आणि जॉन अब्राहमचा खलनायकी अंदाज पहायला मिळाला. 'पठाण' च्या म्युझिकपासून कॉसश्युम पर्यंत सगळ्याचीच चर्चा रंगली आहे.
या सिनेमाची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे दिग्दर्शकानं सिनेमात शूट केलेले जबरदस्त अॅक्शन सीक्वेन्स. हवेतीलच नाही तर बर्फावरील अॅक्शन सीन पाहताना अक्षरशः थरकाप उडतो. या सिनेमातील कास्टिंगही कथेच्या गरजेनुसार अगदी उत्तम जुळून आलेलं आहे.
जर 'पठाण' पूर्ण शेवटपर्यंत पाहिला असेल तर तुम्ही देखील अंदाज लावला असेल की निर्मात्यांनी 'पठाण 2' ची तयारी देखील सुरु केली आहे. हो, सिनेमाच्या शेवटी जेव्हा शाहरुख खान म्हणजे 'पठाण' जीमला मारुन स्वदेशी परततो तेव्हा तो कर्नलला म्हणजे आशुतोष राणाला आपण ड्युटी पूर्ण केल्याचं कळवतो.
यावर कर्नल पठाणला म्हणतो की,'नाही..अजूनही असे कितीतरी मिशन आहेत ज्यासाठी तुझी गरज आहे. ते एक फाईल पठाणला सोपवतात ज्यामध्ये अनेक गुपितं दडलेली आहेत'.
कर्नल पठाणला म्हणतात..हे त्याचे काही नवीन शूर साथीदार असतील आणि पुढील मिशनमध्ये त्याला यांचा वापर योग्य पद्धतीनं करायचा आहे. यावर पठाण विचारतो की, या मिशनवर कोणाची कमांड असेल. तेव्हा कर्नल म्हणतात की,'तलवार तुझी आणि निशाणाही तुझा.., यानंतर 'झूमे जो पठाण' गाणं सुरू होतं आणि सिनेमा संपतो.
आता या सीनला पाहिल्यानंतर असं वाटतं की 'पठाण' च्या सीक्वेलविषयी निर्मात्यांनी एकप्रकारे ही हिंट दिली आहे. आणि म्हणूनच 'पठाण'ला सिनेमाच्या शेवटी शूर लढवय्ये मिशनसाठी दिले आहेत.
आता हे मिशन काय असणार भले याविषयी खुलासा झालेला नाही पण सीक्वेलची चर्चा मात्र यामुळे सुरू झाली आहे. सध्या निर्मात्यांनी कोणत्याही चर्चांवर रिअॅक्ट केलेलं नाही. 'पठाण' सिनेमागृहात दणक्यात सुरु आहे..आणि म्हणूनच निर्मात्यांसोबत चाहतेही खूप उत्साही दिसत आहेत.