
हिंदी वेब सिरीज 'स्कॅम 1992' मुळे अभिनेता प्रतिक गांधीला प्रचंड लोकप्रियता मिळाली. प्रतिकने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात त्याने विशेष स्थान निर्माण केले. 'स्कॅम 1992' ह्या वेब सिरीजचे कथानक हर्षद मेहता या स्टॅाक ब्रोकरच्या जीवनावर आधारीत आहे.
हिंदी वेब सिरीज 'स्कॅम 1992 'मुळे अभिनेता प्रतिक गांधीला प्रचंड लोकप्रियता मिळाली. प्रतिकने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात त्याने विशेष स्थान निर्माण केले. 'स्कॅम 1992' ह्या वेब सिरीजचे कथानक हर्षद मेहता या स्टॅाक ब्रोकरच्या जीवनावर आधारीत आहे. या वेब सिरीजमधील हर्षद मेहताची भूमिका प्रतिक गांधीने केली. या वेब सिरीजचे दिग्दर्शन हंसल मेहता यांनी केले आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
सोमवारी झालेल्या अर्थसंकल्पावर अनेकांनी भाष्य केले आहे. यावर बॅालिवूड सेलिब्रिटींनी काही प्रतिक्रिया दिली नाही. पण प्रतिक गांधीने हर्षद मेहताच्या स्टाईलमध्ये बजेटवर भाष्य केले आहे. प्रतिकने कोणतीही कमेंट शेअर केली नाही पण 'स्कॅम 1992' मधील एक सीन ट्विटरवर पोस्ट केला आहे.या सिनमध्ये हर्षद मेहता म्हणजेच प्रतिक गांधी १९९० च्या सुरुवातीच्या काळातील अर्थसंकल्पाचा आढावा घेत आहे.
#Budget2021 pic.twitter.com/zlSplQ16P4
— Pratik Gandhi (@pratikg80) February 1, 2021
या सीनमध्ये हर्षद मेहता म्हणतो, "यात काही शंका नाही की हे एक उत्तम अर्थसंकल्प आहे,". या डायलॅाग बरोबरच भारतीय अर्थसंकल्पावर हर्षद मेहताचे काय मत होते तेही सांगितले आहे. या व्हिडिओला #बजेट २०२१ असे कॅप्शन प्रतिकने दिले आहे. या ट्टिटला ५ हजार लाईक्स आले असून आणि ९ हजार जणांनी रिट्विट केले आहे. 'पुढचा धमाका कब है प्रतीक भाई .. केमचो मजामा?', 'पूर्णपणे बरोबर प्रतीक भाई' अशा हटके प्रतिक्रिया प्रतिकच्या ट्विटला आल्या आहेत.
Sitharaman presenting the budget. #Scam1992 pic.twitter.com/JLgVFUUGJq
— Hansal Mehta (@mehtahansal) February 2, 2021
केवळ प्रतिकच नव्हे तर या वेब सिरीजचे दिग्दर्शक हंसल मेहता यांनीही बजेटबद्ल प्रतिक्रिया दिली. त्यांनी या वेब सिरीजमधील सीतारमण या भूमिकेचा फोटो शेअर केला आणि "सीतारमण अर्थसंकल्प सादर करीत आहे. #स्कॅम 1992' असे लिहीले आहे. या फोटोमध्ये सीतारमणने हातात केळी ठेवली आहे. त्यामुळे हंसल मेहता अर्थसंकल्पाबद्दल नक्की काय म्हणायचे आहे हे नेटकर्यांना नक्कीच समजले असावे.
Edited By - Prashant Patil