वयात काय आहे  : आलिया भट

वृत्तसंस्था
बुधवार, 21 डिसेंबर 2016

आलिया स्टुडंट ऑफ द ईयरमधून बॉलिवूडमध्ये आली. ती लहानच आहे असं सगळेच म्हणतात; पण ती नुकतीच दिल्लीत टाई या ग्लोबल समिटला जाऊन आली आहे. तेथे जाण्या आधीही, ती एवढी लहान आहे की, या समिटमध्ये जाऊन काय बोलणार, अशी चर्चा होती. महत्त्वाचे म्हणजे, या समिट मध्ये लीडर आणि लीडरशिपबद्दल बोलायचे होते. मग एवढ्या मोठ्या विषयावर बोलायचं म्हणजे आलियाचं वय आणि अनुभव तरी काय? म्हणजे ती याबाबतीत लहानच. चित्रपटसृष्टीतून केवळ तीच या समिटला उपस्थित राहिली. याआधी आमीर खान या समिटला उपस्थित राहिला होता. आलियाला या समिटबद्दल विचारलं तेव्हा ती म्हणाली,""मला समिटचे निमंत्रण आले तेव्हा आश्‍चर्याचा धक्काच बसला.

आलिया स्टुडंट ऑफ द ईयरमधून बॉलिवूडमध्ये आली. ती लहानच आहे असं सगळेच म्हणतात; पण ती नुकतीच दिल्लीत टाई या ग्लोबल समिटला जाऊन आली आहे. तेथे जाण्या आधीही, ती एवढी लहान आहे की, या समिटमध्ये जाऊन काय बोलणार, अशी चर्चा होती. महत्त्वाचे म्हणजे, या समिट मध्ये लीडर आणि लीडरशिपबद्दल बोलायचे होते. मग एवढ्या मोठ्या विषयावर बोलायचं म्हणजे आलियाचं वय आणि अनुभव तरी काय? म्हणजे ती याबाबतीत लहानच. चित्रपटसृष्टीतून केवळ तीच या समिटला उपस्थित राहिली. याआधी आमीर खान या समिटला उपस्थित राहिला होता. आलियाला या समिटबद्दल विचारलं तेव्हा ती म्हणाली,""मला समिटचे निमंत्रण आले तेव्हा आश्‍चर्याचा धक्काच बसला. मी तेथे काय बोलणार? विषय लीडरशिप आणि लीडर असा होता. मी गेले. माझ्यासाठी हा अनुभव छान होता. विविध क्षेत्रातील लोक या समिटसाठी आले होते.
 

Web Title: What is age: Alia Bhatt