
Birthday Special : कृष्णा अभिषेकचं खरं नाव तुम्हाला माहितीये का?
कॉमेडियन कृष्णा अभिषेकचा आज वाढदिवस आहे. या कॉमेडियनवर आज वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. सध्याच्या टॉप कॉमेडियन्समध्ये गणल्या जाणाऱ्या कृष्णाचा जन्म 30 मे 1983 रोजी झाला. गेली अनेक वर्ष कृष्णा लोकांना हसवतोय. म्हणतात ना लोकांना रडवणं एक वेळ सोपं पण हसवणं कठिण... पण हेच कठिण काम कृष्णा अगदी सहज करतो आणि म्हणूनच प्रेक्षकांनी कृष्णाला डोक्यावर घेतलंय. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत त्याचे कोट्यवधी फॅन आहेत.
'बोल बच्चन' आणि 'एंटरटेनमेंट' सारख्या सिनेमात काम केल्यानंतर कृष्णाला चांगली ओळख मिळाली. अभिनय, होस्टिंग आणि कॉमेडी शिवाय कृष्णा उत्कृष्ट डान्सर आहे. त्याने 'नच बलिये', झलक दिखला जा आणि इतरांसह अनेक टेलिव्हिजन नृत्य रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला आहे. कृष्णाने कॉमेडी शोमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी अनेक भूमिका साकारल्या आहेत आणि सध्या तो द कपिल शर्मा शोमध्ये सपनाचे कॅरेक्टर करतो, दे तुफान लोकप्रिय झालंय.
हेही वाचा: "त्यानेच वाद ओढवून घेतला"; गोविंदासोबतच्या वादावर कश्मीराची प्रतिक्रिया
कृष्णा अभिषेकबाबत काही खास गोष्टी
1. कृष्णाचे खरे नाव अभिषेक शर्मा आहे.
2. कृष्णाची आई अमिताभ बच्चन यांची खूप मोठी फॅन होती आणि त्यामुळेच बिग बींच्या मुलाचे नाव 'अभिषेक' त्यांनी आपल्या मुलाचेही ठेवले.
3. अभिनय क्षेत्रात आल्यानंतर त्याने आपले नाव अभिषेकवरून बदलून कृष्ण ठेवले कारण अभिनेता अभिषेक बच्चन पूर्वीपासूनच इंडस्ट्रीत होता.
4. पूर्वी कृष्णाचे नाव क्रिष्ना होते, पण ज्योतिषी संजय जुमानी यांनी त्याला क्रिष्ना नाव बदलून कृष्णा ठेवावे सुचवले. पण तरी, त्याच्या नावाचा उच्चार क्रिष्ना असाच केला जातो.
5. कृष्णा अभिषेकने कश्मीरा शाहशी लग्न केले आहे आणि 2017 मध्ये त्यांनी सरोगसीद्वारे जुळ्या बाळांना जन्म दिला. त्यांची नावं रायन आणि क्रुशांग आहेत.
6. अभिनेता गोविंदा हा कृष्णा अभिषेकचा मामा आहे.
7. कृष्णा अभिषेकची बहीण आरती सिंग, जी टिव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
8. आरती व्यतिरिक्त, कृष्णाच्या चुलत बहिणीही इंडस्ट्रीशी संबंधित आहेत, ज्यांची नावं रागिणी खन्ना आणि सौम्या सेठ आहेत.
9. कृष्णाने त्याच्या कारकिर्दीत हिंदी, तमिळ, मराठी आणि भोजपुरी सिनेमात भूमिका केल्या आहेत.
हेही वाचा: "बिग बींना साथ दिल्याची शिक्षा मला मिळतेय"; गोविंदा इंडस्ट्रीवर नाराज
Web Title: What Is Real Name Of Krushna Abhishek Birthday Special
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..