अनुजा-राकेशची व्हॉट्स ऍप वाली लव स्टोरी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 जानेवारी 2019

सोशल मिडीयाच्या प्रभावामुळे आजच्या तरुणाईची जी 'कुल' भाषा आहे त्या भाषेत चित्रपटाचे संवाद असतील.

मुंबई : अभिनेत्री अनुजा साठे आणि अभिनेता राकेश बापट ही मराठीची नवी जोडी आजच्या तरुणाईची लव स्टोरी घेऊन आली आहे. 'व्हॉट्स ऍप लव' या चित्रपटातून ही जोडी दिसणार आहे.

या फ्रेश लव स्टोरीचे पहिले पोस्टर रिलीज झाले आहे. 'व्हॉट्स ऍप लव' चित्रपट मराठी व हिंदी अशा एकत्रित भाषेत चित्रीत करण्यात आला आहे. म्हणजेच सोशल मिडीयाच्या प्रभावामुळे आजच्या तरुणाईची जी 'कुल' भाषा आहे त्या भाषेत चित्रपटाचे संवाद असतील. राकेश व अनुजाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन चित्रपटाचे पहिले पोस्टर पोस्ट केले आहे. या पोस्टरवर, दोघेही कलाकार एकमेकांना पाठमोरे उभे असून दोघांच्याही हाती मोबाईल फोन दिसत आहे. या चित्रपटाची टॅगलाईन 'किप युवर लव कनेक्टेड' अशी आहे. 

चित्रपटाचे दिग्दर्शक हेमंत कुमार महाले यांनीच चित्रपटाची निर्मीती सुध्दा केली आहे. या चित्रपटातून सारेह फार ही बॉलिवूड अभिनेत्री मराठीत पदार्पण करत आहे. हा चित्रपट येत्या 5 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: WhatsApp Love marathi movie first poster release