ranveer deepika
ranveer deepika

लग्नाआधी दीपिकाला बुरखा घालण्यास का सांगितलं? सब्यसाचीचा खुलासा

प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जीने दीपिकाच्या लग्नाविषयी केला खुलासा

अभिनेत्री दीपिका पदुकोण Deepika Padukone आणि रणवीर सिंगने Ranveer Singh १४ नोव्हेंबर २०१८ रोजी इटलीत लग्नगाठ बांधली. या लग्नाची तयारी होईपर्यंत कोणालाच त्याचा थांगपत्ता लागला नव्हता. इतकंच नव्हे तर प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जी Sabyasachi Mukherjee यांनी सहा महिन्यांपर्यंत दीपिका-रणवीरच्या लग्नाची बातमी गुलदस्त्यात ठेवली होती. लग्नातील दीपिका-रणवीरच्या सर्व कपड्यांचं डिझाइन सब्यसाचीनेच केलं होतं. पापाराझी, पत्रकार आणि इतर चाहत्यांकडून लग्नाचं आणि लग्नात परिधान करणाऱ्या कपड्यांबाबत सिक्रेट ठेवण्यासाठी सब्यसाचीने दीपिकाला चक्क बुरख्यात बोलावलं होतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी याबद्दलचा खुलासा केला. (When Sabyasachi Mukherjee asked Deepika Padukone to come in burqa for bridal outfit fittings)

दीप-वीरच्या लग्नाला फक्त जवळचे कुटुंबीय उपस्थित होते. इटलीतील लेक कोमो या नयनरम्य ठिकाणी बॉलिवूडच्या या प्रसिद्ध जोडीने लग्नगाठ बांधली. 'बिझनेस ऑफ फॅशन'ला दिलेल्या मुलाखतीत सब्यसाची म्हणाले, "दीपिकाच्या आधी मी अनुष्काच्या लग्नातील कपड्यांचंही डिझायनिंग केलं होतं. तेव्हा फक्त एक महिनाच आम्हाला तयारीसाठी मिळाला होता. पण दीपिकाच्या लग्नाला सहा महिने होते आणि आधीच त्यांच्या लग्नाची फार चर्चा सुरू झाली होती. अशा वेळी सेलिब्रिटीच्या कपड्यांचं डिझाइन करणं फार कठीण असतं. कारण त्याविषयी कोणतीही माहिती आम्हाला पसरू द्यायची नसते. ब्रायडल आऊटफिटसाठी अनेक लोकांची मदत घ्यावी लागते आणि विविध ठिकाणी प्रवाससुद्धा करावा लागतो. दीपिकाच्या लग्नाचं सिक्रेट ठेवण्यासाठी आम्हाला दुसरं नाव सुचवावं लागलं. नाओमी कॅम्पबेल हे नाव आम्ही ठरवलं आणि नाओमीच्या लग्नाची तयारी करत आहोत, असंच आम्ही दाखवलं."

ranveer deepika
'आमच्यात भांडण झालं की, आम्ही बंगालीतच बोलतो'

मुंबई शोरुममधल्या काही लोकांनाच दीपिकाच्या लग्नाविषयीची माहिती होती. कारण दीपिका तिच्या लग्नाच्या कपड्यांचा माप पाहण्यासाठी तिथेच यायची, असं सब्यसाचीने सांगितलं. "दीपिकाला शोरुमध्ये येताना कोणत्याही पत्रकाराने पाहिलं तर संपूर्ण प्लॅन फ्लॉप होईल या भीतीने मी तिला बुरख्यात यायचा सल्ला दिला होता. माझ्या शोरुममधल्या बहुतेक लोकांना तिच्या लग्नाविषयीची माहिती होती. जवळपास १८०० लोक इथे मुंबईत काम करतात. त्यापैकी अनेकांना हेच वाटलं होतं की नाओमी कॅम्पबेल भारतीय राजकुमाराशी लग्न करतेय", असं तो पुढे म्हणाला. लग्नातील दीपिकाच्या लेहंग्याची, तिच्या लूकची सर्वत्र चर्चा झाली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com