
जेव्हा 'भाबीजी घर पर हैं' शोमध्ये पोहोचली होती सनी लिओनी
गेल्या ६ वर्षांपासून 'भाबीजी घर पर हैं' (Bhabiji Ghar Per Hein) हा शो प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहे. या शोच्या पात्रांइतकं वेगळेपण क्वचितच कोणी असेल. यामुळेच 2015 मध्ये सुरू झालेला हा शो लोकांना खूप आवडला आहे. अनेक पात्रे बदलली असली तरी त्यांचा रंग अजूनही कायाम आहे.
या शोशी संबंधित रंजक किस्से अनेकदा ऐकायला मिळतात आणि असाच एक किस्सा म्हणजे जेव्हा अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone)शोमध्ये पोहोचली.
तुम्हाला माहिती असेल की सनी लिओनी भाबीजी घर पर च्या एका एपिसोडमध्येही दिसली आहे. 2016 मध्ये एका एपिसोडमध्ये सनी लिओनीने एक स्पेशल एपिसोड केला होता जो खूप आवडला होता. ही कथा देखील या भागाशी संबंधित आहे.

Bhabiji Ghar Per Hein
शोमध्ये अंगूरी भाबी 'सही पकेङे हैं' ही खास ओळ बोलते. आणि तिची ही स्टाइल सगळ्यांना खूप आवडते. जेव्हा सनी लिओनी शोमध्ये पोहोचली तेव्हा तिलाही ही ओळ सांगण्यात आलेली पण सनीने ते बोलण्यास साफ नकार दिला. तिला हिंदी नीट येत नसल्यामुळे तिला ही ओळ आवडली नाही आणि तिने ती बोलण्यास साफ नकार दिला.
हेही वाचा: Bigg Boss Marathi 3 Winner: सांगलीच्या विशाल निकमबद्दल काही खास गोष्टी..

Bhabiji Ghar Per Hein
यानंतर शोचे निर्माते जेव्हा सनीला समजवायला बसले तेव्हा त्याला एक तासाची मेहनत घ्यावी लागली. तासभर तो सनीला या ओळीचा अर्थ समजावून सांगत राहिला. अखेर सनी लिओनने यासाठी होकार दिला. भाबीजी घर पर हैं शो 2015 मध्ये लाँच झाला आणि तेव्हापासून तो टीआरपीमध्ये (TRP) राहिला आहे. या शोला चांगलीच पसंती मिळत आहे आणि प्रेक्षक शोमधील पात्रांवर प्रेम करत आहेत.
Web Title: When Sunny Leone Entered Bhabiji Ghar Per Hein
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..