कोण आहेत ते स्टारकिड, ज्यांच्याविषयी शाहरुख  बोलत आहे

सकाळ वृत्तसेवा
Friday, 12 June 2020

सोबतच त्याला रणबीर कपूर- दीपिका पदुकोण, रणवीर सिंग- दीपिका पदुकोण, आलिया भट्ट-सिद्धार्थ मल्होत्रा, फवाद खान- सोनम अशा जोड्यांचे पर्याय देण्यात आले होते. मात्र शाहरुखने या जोड्यांव्यतिरिक्त अन्य एका जोडीचं नाव घेतलं. विशेष शाहरुखने या जोड्यांपैकी एकाचंही नाव न घेतला अबराम आणि ऐश्वर्या-अभिषेकची लेक आराध्या हिचं नाव घेतलं.

अलिकडच्या बाॅलिवूडमधील कलाकारांपेक्षा त्यांच्या मुलां मुलींची नेहमीच चर्चा रंगलेली आपल्याला पाहायला मिळतं. आतापर्यंत अनेक स्टारकिडने म्हणजे ऐश्वर्या रायची मुलगी आराध्या, करीनाचा मुलगा तैमूर तर शिल्पा शेट्टीचा मुलगा विआन यांनी आपल्या पालकांप्रमाणेच नेहमीच चर्चेत असतात. त्यात आता काही पुढच्या पिढीतील म्हणजे सुहाना खान, न्यासा देवगण, खुशी कपूर हे स्टारकिडही लवकरच कलाविश्वात पदार्पण करतील असं सांगितले जात आहे.

शाहरुख खानची मुलगी सुहाना आणि  मुलगा अबराम हे दोघं कायमच सोशल मीडियावर चर्चेत असतात. सुहाना लवकरच कलाविश्वात पदार्पण करेल असं सांगितलं जात आहे. परंतु, या सगळ्यामध्ये शाहरुखने अबरामची मोठ्या पडद्यावर कोणत्या स्टारकिडसोबत जोडी सुपरहिट ठरेल हे सांगितलं आहे. विशेष म्हणजे त्यांचं उत्तर ऐकून अमिताभ बच्चन यांनीही प्रतिक्रिया दिली. अलिकडेच शाहरुख आणि काजोल या सुपरहिट जोडीने एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी शाहरुखला काही प्रश्न विचारण्यात आले. त्यात सध्याच्या लोकप्रिय कलाकारांच्या जोड्यांपैकी जर तुझी आणि काजोलची जोडी रिप्लेस करायची असेल तर तू कोणासोबत करशील? असा प्रश्न शाहरुखला विचारण्यात आला.

सोबतच त्याला रणबीर कपूर- दीपिका पदुकोण, रणवीर सिंग- दीपिका पदुकोण, आलिया भट्ट-सिद्धार्थ मल्होत्रा, फवाद खान- सोनम अशा जोड्यांचे पर्याय देण्यात आले होते. मात्र शाहरुखने या जोड्यांव्यतिरिक्त अन्य एका जोडीचं नाव घेतलं. विशेष शाहरुखने या जोड्यांपैकी एकाचंही नाव न घेतला अबराम आणि ऐश्वर्या-अभिषेकची लेक आराध्या हिचं नाव घेतलं.

“मला असं वाटतं की, अबराम आणि आराध्याची ऑनस्क्रीन जोडी जास्त छान दिसेल”. यावर ‘अबराम, आराध्यापेक्षा वयाने लहान आहे’, असं काजोल म्हणाली. त्यावर शाहरुखने पटकन ‘प्रेमाला वयाची अट नसते’, असं प्रतिउत्तर दिलं. विशेष म्हणजे अन्य एका मुलाखतीत बिग बींना याविषयी विचारलं असता, त्यांनी आनंदाने ‘उनके मुंह में घी शक्कर और दूध मलाई’, असं म्हणाले.

हेही वाचा : अमिताभ बच्चन म्हणजे...? नेमकं ;याअभिनेत्याला बिन बी बद्दल काय वाटतंय, कोण आहे तो अभिनेता...

यावेळी बिग बींचं उत्तर ऐकल्यानंतर अनेकांच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या. आतापर्यंत आलिया भट्ट, अनन्या पांडे, वरुण धवन, रणबीर कपूर या स्टारकिड आणि लोकप्रिय कलाकारांची चर्चा रंगत होती. मात्र आता तैमुर अली खान, मीशा राजपूर, अबराम, आराध्या, करण जोहरची दोन्ही मुलं, तुषार कपूरचा मुलगा हे प्रकाशझोतात असल्याचं दिसून येत आहे. आपल्या पाल्यांच्या एक पाऊल पुढे त्यांच्या स्टारकिड्सची चर्चा सुरू होत असलेली पाहावयास मिळत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Who are the Star kids